Jump to content

पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १२७ हातांत सांपडावी हा अननुरूप संसर्ग झाल्यामुळे विषमालंकार. भयानक आणि करुण रस. थोरांनाही प्राक्तनकर्मभोग चकत नाही असा भाव. यमक, छेकानुप्रास. शिखरिणी वृत्त.. ७९. 'त्रिपुरमथनी' याने शिवाचे विक्रमशालित्व सूचित झाले. हे विशेष्यपद हेतुगर्भ असल्यामुळे परिकरांकुर अलंकार. कोणीकडे 'त्रिपुरमथन' आणि कोणीकडे 'सुरवधूवंद्य काम ' असें वैषम्य ध्वनित झाल्यामुळे विषमालंकार. 'सुरवधूवंद्य आणि ‘सरसा' यांनी कामाचें कोमल आणि मधुर सौंदर्य प्रतीत होऊन अपौरुषही भासमान झाले. प्रस्तुत हेतुगर्भ विशेषणसामर्थ्याने परिकरालंकार. समर्थ आणि पूज्य अशा पुरुषाशी दुर्बल आणि क्षुद्र माणसाने स्पर्धा करूं नये, केल्यास त्याचाच नाश होईल हे व्यंग्य. शिखरिणी वृत्त. ८०. मर्कटांच्या क्रियांचे वर्णन झाले ह्मणून स्वभावोक्ति. उपजाति वृत्त. अथवा 'सभेत ' याबद्दल 'गोष्टींत ' असा पाठ कल्पून इंद्रवजा वृत्त समजावें. ८१. गीतिच्छंद. छेकानुप्रास. नारायणपादपद्मभजनादिक हेच तीर्थादिक आहे, अन्य नाही असा अर्थ तात्पर्यरूपाने गम्यमान होतो ह्मणून आर्थी प्रश्नपरिपूर्विका परिसंख्या हा अलंकार झाला. ८२. उपमालंकार. छेकानुप्रास. दिंडी. ८३. गुणपूर्णतेचे दोषरूपाने वर्णन झाल्यामुळे, आणि गुणहीनतेचे गुणरूपानें वर्णन झाल्यामुळे लेशालंकार. प्रथमार्धातील अर्थाचें द्वितीयार्धातील हेतुभूत अर्थाने समर्थन झालें यास्तव काव्यलिंग. · इतर' शब्दानें क्षुद्रता व्यक्त झाली. 'मलयजा' पदाने निसर्गोन्नति सूचित झाली. छेकानुप्रास. द्रुतविलंबित वृत्त.