Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणी मनावर घेत असल्यास त्यांच्या स्मारक फंडासाठी मदत करण्याची माझी तयारी आहे.” सत्यशोधक चळवळीचा पाया घालणाऱ्या महात्मा फुलेंच्या स्मारकाची आवश्यकता सर्वप्रथम स्पष्ट करतानाच या स्मारकासाठी मदत करण्याची सयाजीरावांनी दर्शवलेली तयारी त्यांच्या मनातील जोतीबांच्या कार्याविषयीची आपुलकी दर्शविते.
साहित्यिक सावित्रीबाई आणि बडोदा

 फुलेंच्या सहवासाने विचारसंपन्न झालेल्या सावित्रीबाईंनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लेखन व भाषणे यांचा मार्ग स्वीकारला. १९५४ मध्ये सावित्रीबाईंचा 'काव्यफुले' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहात त्यांनी समाजसुधारणाविषयक मानवतावादी दृष्टिकोनातून स्त्री- पुरुष समतेवर आधारित नवसमाज निर्मितीचा विचार मांडला. केशवसुतांच्या अगोदर ३० वर्षे, तर जोतीबांच्या 'छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा' या १८६९ साली प्रकाशित झालेल्या काव्यात्मक रचनेच्या अगोदर १५ वर्षे हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. जोतीरावांच्या मृत्यूनंतर १८९२ ला सावित्रीबाईंनी ‘बावनकशी सुबोध रत्नाकर' या दीर्घ काव्यातून महात्मा फुले यांचे अधिकृत असे पहिलेच काव्यात्मक चरित्र लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. महात्मा फुलेंना त्यांच्या वैचारिक वाटचालीत सक्रिय पाठिंबा देणाऱ्या 'बडोद्या'ने हीच भूमिका सावित्रीबाईंबाबतही निभावली. १८९२

महाराजा सयाजीराव आणि सावित्रीबाई फुले / १८