Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथलेखन व्यवसायातील प्रवेशाचे श्रेय धामणस्करांना दिले आहे. महाराजांनी पुढे केळूसकरांना सात उपनिषदांचे भाषांतर करण्याची संधी दिली. हे काम केळूसकरांनी १८९९ ला पूर्ण केले. असे काम करणारे केळूसकर हे पहिले ब्राहमणेत्तर आहेत.
 ११ ऑक्टोबर १८८५ रोजी दामोदर सावळाराम यंदे आणि रामजी संतुजी आवटे या सत्यशोधकांच्या साथीदारांनी 'बडोदावत्सल' हे सत्यशोधकी वर्तमानपत्र बडोद्यात सुरु केले. पुढे ३१ नोव्हेंबर १८९३ रोजी दामोदर सावळाराम यंदे यांनी ‘श्री सयाजीविजय' हे नवे साप्ताहिक स्वतंत्रपणे सुरू केले. नामांकित कंत्राटदार असणाऱ्या स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू या प्रमुख सत्यशोधक नेत्याला सयाजीरावांनी आपल्या लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामास हातभार लावण्याची संधी दिली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात १८८५ मध्ये शेटजी- भटजींच्या विरुद्ध सत्यशोधकांकडून सभा घेतल्या जात. यावेळी सत्यशोधक

दामोदर सावळाराम यंदे
महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / २०