पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भारतीय ज्ञानव्यवस्थेत संस्कृत भाषेच्या माध्यमातून ब्राह्मणांनी ज्ञानव्यवस्था आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे दोन-अडीच हजार वर्षे ते हिंदू समाजव्यवस्थेवर सत्ता गाजवत आले. ब्रिटिश काळात त्यांच्या या दीर्घ परंपरेला हादरे बसण्यास सुरुवात झाली. या कालखंडातील पहिल्या टप्प्यातील हा अनुभव, परंपरा पाहता स्वाभाविक म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे ब्राह्मणी अहंकार आणि तुच्छतावाद याचाही तो प्रातिनिधिक हुंकार म्हणून विचारात घ्यावा लागेल. आपल्याला मिळालेली ही वागणूक पुढे १२ वर्षानंतर १८९९ मध्ये मूळ संस्कृत ग्रंथांवरून उपनिषदांचे निर्दोष भाषांतर करून कशी निरर्थक आहे हे केळुसकरांनी सिद्ध केले.
मराठा ऐक्येच्छू सभा

 समाजातील मागास जातींच्या उन्नतीसाठी कृष्णराव केळुसकरांनी काशीनाथ कोरगावकर, विनायकराव दादाजी, माधवराव निगवेकर, डॉ. ल. ब. धारगळकर इ. मित्रांच्या सहकार्याने मे १८८७ मध्ये 'मराठा ऐक्येच्छू सभा' नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचा उद्देश पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आला होता..
 विद्येत मागासलेल्या मराठी भाषा बोलणाऱ्या हिंदू लोकांत म्हणजे मराठे, वाणी, भंडारी, कुणबी, तेलगु, आगरी, माळी, कोळी, वंजारी, शिंपी, तेली, गवळी, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी वगैरे शेतकरी व कारागीर लोकांत-.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / १३