Jump to content

पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/465

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फुला नावाडी यास बोलावून नेऊन लिहिल्याप्रमाणे करणे. जाणिजे. छ९ मोहरम. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२३४] ॥श्री॥ २६ आगष्ट १७६०. श्रीमंत राजश्री गोविंदपंतदादा स्वामीचे सेवेसी: आज्ञाधारक शिदाप्पाशेट वीरैकर रामराम विनंति उपरि येथील कुशल त॥ छ १४ माहे मोहरम जाणून मुकाम लष्करनजीक दिल्ली जाणून स्वामीच्या कृपेंकरून सुखरूप असो. विशेष. आपल्याकडून बहुत दिवस पत्र येऊन साकल्य वृत्त कळत नाही. तरी ऐसें नसावें. सदैव पत्री सांभाळ करावा. प्रस्तुत सरकारांतून श्रीमंतांनी वरात आपल्याकडे रु॥ १५००० पंधरा हजारांची दिली आहे. ती वरात बजिन्नस शुभकर्ण ब्राह्मण याजबरोबरी स्वामीकडे पाठविली आहे. तरी ऐवज रसदेच्या ऐवजी देविला असे. तरी हे रु॥ पंधरा हजार जालोनास देविलिया आमास पोहोचतील. तेथे आमचा खरीदीचा खोळंबा न होय ते करावें. सर्व प्रकारे स्वामीचा भरोसा जाणून वरात आपल्याकडे घेतली आहे. येथील कामकाज आमा ल्याख जें असेल तें आज्ञा करावी. सेवेसी सादर असो. रुस येथें तोटा जाणून पत्रीं विस्तार लिहिला असे. सरकारांत ऐवजाचा तोटा आहे, ह्मणन श्रीमंतांचे चित्त स्वस्थ नाही. तरी आपण श्रीमंतांची कृपा संपादन घेतीलच. परंत, सूचनार्थ सेवेसी लिहिले असे. + बहुत काय लिहून. कृपालोभ असो दीजे. हे विनंति. [२३५] ॥ श्री ॥ २७ आगष्ट १७६०. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून ३०५ वीरवाल्हे येथील. हे पेशव्यांचे कामिसारीजनरल होत.