Jump to content

पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वकीय लिहिणे. विशेष. राजश्री माधवराव नारायण व चिंतामणराव नारायण पाटणकर यांस चिरंजीव राजश्री दादासाहेबाकडे रवाना केले आहेत. त्यास चिरंजीवाची स्वारी लांब गेली; आणि वॉट न चाले; निभाव न होय तरी तुह्माजवळ रहातील. यास रोजमुरा.. दीडमाही रुपये आठवडा रुपये ५० माधवराव नारायण २ माधवराव नारायण १ ६० चिंतामणराव. नारायण ॥ चिंतामणराव नारायण २ ११० एकूण एकशे दहा रुपये दीडमाही व साडेसहा रुपये तीन राऊतास आठवडा पावत आहे. याप्रमाणे रोजमुरा सदई प्रे॥ देत जाणे. जाणीजे. छ १३ जमादिलाखर, सु।। समान खमसैन मय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. ॥ श्री॥ [१२३] २२ एप्रिल १७५८. तालीक रॉजश्री कमावीसदार वर्तमान व भावी प॥ इटावे प्रांत अंतरवेद गोसावी यांसिः स्नेहांकित रघुनाथ बाजीराऊ नमस्कार व आशीर्वाद. सु॥समान खमसैन मय्याअल्लफ. वे॥ हर गोविंद विश्वनाथ बिन पेमनाथ ब्राह्मण कानकुडष यांणी हुज़र कसबें लाहोरचे मुक्कामी येऊन विदित केले की “ पातशाही बेगम यांणी मौजें कनकपूर प॥ मजकूर येथील सायेरपैकी रोज चार आणे करून दिल्हे होते. याप्रमाणे चालिलें. सरकारचा अंमल जाहालियापासून १७६ नवीन जिंकलेला देश असल्यामुळे वाटेंत दगा होण्याची भीति होती. १७७ लेखांक ५१ टीप पहा.