Jump to content

पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१११ रेहून फौज गोकुळवृंदावनास पाठविली की लुटून घेणे. त्यास, तेथे बहिरागी दोन चार हजार "नागे जमा होऊन युद्ध घेतले. दोन हजार बैरागी मेले व दोन हजार पठाणाचं मनुष्य मेलें. इतक्यांत पठाणास जुगुलकिशोर वकील याणे सांगितले की फकिरांचं स्थल आहे तेथे पैशाची जात नाही. तेव्हां पठाणाने स्वार पाठवून आपले लोक फिरवून आणविले. कुल बैरागी मेले, परंतु गोकुळनाथ वाचविले. जुगुलकिशोर पठाणापाशी पेश आहे. तेथून पठाण कुच करून आगरेयाजवळ आला. आगन्याची रयत बाहेर येऊन भेटली. पांच लक्ष रुपये खंडणी द्यावी असा तह जाहाला. त्यास रुपयांचा भरणा होणे तर रयतीस कठीण जालें. वायदाहि टळला. तेव्हां पठाणाने आगन्यावर हल्ला करून लुटून पस्त केले व किल्लयास मोर्चे लावून किल्ली हस्तगत केला. गाजद्दीखान किल्यावर जाऊन किल्ला घेतला.. शहरांत द्वाही पातशाहाची फिरविली. पठाण पांच सात दिवस येथे राहून कुच करून आठ कोस पुढे आला. तेथे मुक्काम दहावीस आहेत. दिल्लीची रयत पळून मथुरेस आली, मथुरेहून आगन्यास आली. आगन्यांत पठाण येणार ह्मणून कुल मातबर लोक होते ते व गरीबगुरीब ऐसे आगन्याहून राजश्री नारो शंकर व समशेर बहादर यांचे लष्करांत आले. त्यास, पठाण १३५ नागे व गोधड, दोन मठ, वैराग्यांचे, उत्तरहिंदुस्थानांत व माळव्यांत ओंकारमांधाता वगैरे ठिकाणी प्रसिद्ध आहेत. १३६ हा किल्ला घेतल्याचा वृत्तांत भाऊसाहेबाच्या बखरीतील वृत्तांताच्या अगदी उलट . आहे. तेथें जो पाल्हाळ केला आहे तो बराच अविश्वास्य आहे. गाजुद्दिखान किल्ल्यावर आश्रा मागण्यास गेला नसून तो ताब्यात घेण्याकरितां गेला होता. अबदाली किल्ला न घेतां परतला असें में बखरीत मटलें आहे तसा प्रकार नसून, उलटा अबदालीने किल्ला मोर्चे लावून घेतला. अलमशाहा व गाजुद्दिन ह्यांना अवदालीने कैद केले नसून, उलटें गाजाईनाशी त्याने मित्रत्व केले व जेथें तेथें अलमागराची द्वाही फिरविली. अंताजी माणकेश्वराने पठाणास चांगला हात दाखविला व तेथून निघून, बखरीत ह्मटल्याप्रमाणे तो बलभगडास न जातां, श्रीमंताच्या सैन्यांत आला. एकंदरीत भाऊसाहेबाच्या बखरीतील ३०, ३१, ३२, ३३ ह्या पृष्ठांवरील मजकूर थोडा इतिहास व बरीच कादंबरी ह्यांच्या मिश्रणानें बनविलेला आहे असें ह्या पत्रावरून दिसते.