पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रधान यांसी सलख राखाल तर बेहतर बात आहे. कांहीं नौदीगर करून बिघाड करूं म्हणाल तर आमी तुमचे रफीक नाहीं, रावप्रधान यांचे रफीक आहों, ह्मणोन लिहिलें व आमांसहि लिहिले त्याजवरून सलाबतजंग व रुकुनदौला बहत पस्तावलें की आझांस सर्व प्रकारे भरंवसा तुमचा असतां तुझी ऐशा गोष्टी करिता. अज्याईब आहे! हाली सलाबतजंग यांहीं रुकुनदोला यांचे मसलहतीने आम्हांस कितेक समाधानाच्या गोष्टी लिहिल्या की तुमचा गिल्ला लिहिला नाही. गनीमाचा घावडाव तुम्हांस कळत नाही. तुम्ही येतच आहां. तुमची आमची मुलाजमत लौकरच होईल. जें करणें तें तुमचे मसलहतीने करूं म्हणोन कैवजा लिहिलें. ऐसें बोलोन तें पत्र सेवकास वाचूनहि दाखविले. त्यानंतर बोलिले की आली लोक कोणे करीनेयाचे व मोगललोक व मोगलाईचे मराठे सरदार कोणे करीनेयाचे हे रावसाहेब बेहतर जाणत असतील व रावसाहेब आमास कलमी करीत असतात की मोगल लोक मनांत खोटे, बाहेर नीट, याजवरून रावसाहेब खुब जाणतात. आह्मी लोक एकवचनी, जो करार केला तो केलाच, त्यांत तफावत होऊ देणार नाही. आपले सुखुनाबद्दल दौलतेनसी व ज्यानानसीं कोसीस करूं. मोगल लोक काबुची आहेत. रावसाहेबांचे दौलेतेची रोजबरोज तरकी होते, हे गोष्ट त्यांस खुष लागत नाही. वेळ पाहोन दगा करावयास जपतच आहेत. ईलाज न चाले; तेव्हां खुशामतीसहि हजीर. ऐसे या लोकांचे करीने आहेत. रामदासपंताचे हंगामेयांत काय काय दगाबाजी केली तें अलमावर रोशन आहे. रावसाहेबाचे ताळे बुलंद ह्मणोनच ते बाजी सर केली. सालगुदस्तां महाराव येही मल्हारराव होळकर यांस फोडावयाचा मनसबा केला. लेकिन शेवटास न गेला. मग पस्तावोन खुशामतीस लागले. पुढेहि दगाबाजीस चुकणार नाहीत. आह्माजवळहि येखलास करावयास चाहतात. आतां आमी कोणास पछाणत नाही व आमास दगाबाजीचा येखलास करितां येत नाही. आह्मी रावप्रधानसाहेबांस मात्र जाणतों. रावसाहेबांचे दौलतेची तरकी पाहोन खुशवख्त होतो. व याहून तरकी व्हावी ऐसें चाहतों. याजक