पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८१ )

सारखे पटापट मृत्युमुखी पडूं लागले | या दुहेरी दैवी आपत्तांमुळे, सर्व देश उजाड झाला ! आणि थोड्याथोडक्या जगलेल्या लोकांची अत्यंत विपन्ना- वस्था झाली ! त्यांतल्यात्यांत निजामशाही राज्याची स्थिति तर अतीशयच खालावली ! सर्व सरदार फुटलेले, तिजोरीस क्षय लागलेला, दुष्काळामुळे सरकारी वसुलीस जबर धक्का बसलेला, राज्यकर्त्यांचें पोरवय, कर्तृत्ववान् योद्धथांचा अभाव, राजकारणी पुरुषाची न्यूनता, मार्गदर्शक पुढान्याची कम- तरता, या सर्व कारणांमुळे तें राज्य अगदर्दी डबघाईस येऊन गेलें; व तक रीबखानासारख्या नालायक वजिराच्या हाती राज्यसूत्रे असल्यामुळे तीच स्थिति कायम राहून उलट तींत अव्यवस्थेची सारखी भरच पडत गेली !

 यावेळी निजामशाही राज्य जिंकण्याची कामगिरी महाबतखान या नांवाच्या एका शूर सरदारावर सौंपवून शहाजहान बादशहा उत्तर प्रांती परत निघून गेला होता; तरी सुध्दां मोंगल सैन्यास उत्तरेंतून आणखी कुमक येऊन दाखल झाली होती; आणि अशा स्थितीत “राज्य कसें जगवावें " हीच मुख्य विवंचना निजामशहास सारखी लागलेली होती. आपल्या या सर्व आपत्तीला आपला नालायक व कर्तृत्वहीन वजीर तकरीबखान हाच मुख्यतः कारणीभूत आहे, असे त्याच्या मनानें घेतलें; फत्तेखान हा शहाचा भामा असल्याने त्यास बंधमुक्त करण्याबद्दल त्याची बहीण म्हणजे शहाची आई- त्यास सारखा आग्रह करीत होती. त्याचा शहाच्या मनावर परिणाम झाला; व फत्तेखानास खिवरच्या किल्ल्यांतील प्रतिबंधांतून मुक्त करून त्याच्या हाती पुन्हां निजामशाही राज्याची सूत्रे सोपविल्यास राज्यव्यवस्थेची पुन्हा सुव्य- स्थित घडी बसेल, असे त्यांस वाटू लागले होतें. त्याप्रमाणे त्यानें तकरी- बखानास अधिकारभ्रष्ट केलें. तकरीबखानास हा मानभंग असह्य होऊन तो निजामशाहीचा पक्ष सोडून मोंगलास जाऊन मिळाला; व तिकडे त्यास सहा हजारांची मनसब मिळून तो त्यांचा सरदार बनला; आणि फत्तेखा- नाची प्रतिबंधांतून मुक्तता करून ( इ० सन १६३० ) त्यास पुन्हा पूर्वी- प्रमाणें वजिरीपदावर स्थानापन्न केलें.

 परंतु फत्तेखानास बंधमुक्त करण्यांत शहाची चूक झाली; आणि त्यास