पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७८)

लोदी याचा, परिखान ऊर्फ खानजहान हा मुलगा असून तो पूर्वी शहाजादा पर्वोझ हा दक्षिण प्रांताचा सुभेदार असल्यावेळी त्याचा मदतनीस म्हणून त्या प्रांतांत राहिलेला होता; आणि आपल्या सुनी पंथाचा मलिकंधर यांस मिळून त्यानें निजामशाहांतील मोंगलांना जिंकलेल्या प्रदेशापैकी बराच प्रदेश त्या राज्यास परत देऊन उपकारबद्ध केलें होतें. त्यामुळे निजामशाहीतील मोठ- मोठ्या सरदारांचें त्र त्याचें पूर्वीपासूनच सख्य होतें; म्हणून त्यांनी आणि 'शहाजी व निजामशहा यांनी त्याचा पक्ष घेतला, व मोंगलांशी युद्ध करण्यास सुरवात केली. मोंगल सैन्यही मोठ्या नेटानें झगडूं लागले; परंतु लोदी हा स्वतःच शूर होता; कसलेला योद्धा होता; आणि यावेळी तर शहाजीसारखा पराक्रमी सरदार त्यास साह्यकारी असल्यामुळे मोंगली सैन्यानें आपली परा काष्ठा केली तरी लोदी आवरला जात नव्हता. ही हकीकत शहाजहान यांस कळल्यावर हे बंड फैलावते की काय, याबद्दल त्यास भीती वाटली; अतीशय राग आला, व निजामशाही, लोदी व शहाजी यांना नामशेष करण्याच्या निश्चयानें, तो स्वतः पुष्कळ सैन्यानिश, मोठ्या धडाडीनें दक्षिण प्रांतांत येऊन दाखल झाला. आपल्या सैन्याचे तीन भाग करून लोदीला जोराचा शह दिला; त्यामुळे त्याच्या सैन्याची वाताहत होऊन तो आश्रयाकरितां भटकूं लागला; निजामशाही व आदिलशाही राज्यांत आश्रय मिळविण्या- करितां त्यानें पुष्कळ प्रयत्न केला, व तो निष्फळ झाल्यामुळे लोदी पुन्हां उत्तरेकडे वळला. परंतु मोंगल सैन्य सारखें त्याचा पिच्छा पुरवीत अस- ल्यानें त्यास अखेरीस त्या सैन्याशी युद्ध करावे लागलें; आणि कालिंजर नजीक बादशाही सैन्यार्शी युद्ध करीत असतांनाच तो ठार मारला जाऊन हे लोदीचें बंड नामशेष झालें.

 लोदी दक्षिण प्रांतांत होता, त्यावेळेपासूनच त्याच्या पक्षांतील मराठे सरदारांना फोडून आपल्या पक्षास मिळवून घेण्याचा शहाजहान यानें सारखा प्रयत्न आरंभिला होता; व लोदीचा पक्ष सारखा कमजोर होत जाऊन शहा• जहानच्या प्रयत्नास यश येत चाललें होतें; अशी परिस्थिति पाहून, व बाद शाही सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही, हे ओळखून शहाजीनें 2 जिमखान या नांवाच्या एका सरदारामार्फत शहाजहानकडे संधान बांधिलें,