पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५२)

खटपट तर निष्फळ झालीच परंतु अखेरीस तंजावरच्या राजघरा- ण्याची खासगी दसित तंज वरच्या राण्यांकडे ठेवावी, असें कोर्ट ऑफ डायरेक्टर यांनी ठरविल्यामुळे, ही त्यांची खाजगी मालामेळकत त्यांना एकहांची परत मिळाली. राणी कामाक्षीबाई हो फार उदार व धार्मिक होती. तंजावर येथील बृहदीश्वराचें देवस्थान, इतर दुसरी देवस्थानव धर्मादाय यांचा व्य वस्था तंजावरच्या राजवाड्यांतून होत आली होती, ती तिनें आपल्या हयातीत मोठी नमुनेदार व उत्कृष्ट ठेविली होती. ती इ० सन १८९२ मध्ये व शिवाजी राजे याच्या पाश्चात् त्याच्या विद्यमान राण्यांपैकी शेवटची राणे जिजांबाबाईसाहेब ही इ०सन १९१२ मध्यें; [ता. ३ मे रोजी] मृत्यु पावली. शिवाजीराजे यांस औरस पुत्रसंतती नसून फक्त दोन कन्या होत्या. त्या दोन्हीही कोल्हापूर येथील जुन्या मराठी घराण्यापैकी श्रीमंत सखाराम रावसा- हेब मोहिते हंबीरराव यांस दिल्या होत्या. त्यापैकी पहिली कन्या लग्न झाल्या वर अल्पवयांतच कालवश झाल्यामुळे दुसरीही कन्या सखाराम रावसाहेब यांसच दिली होती. तिचें नांव विजय मोहना मुरूंबाबाई साहेब हैं असून तिला इंग्रज सरकाराकडून दरमहा तीन हजार रुपये पेनशन, व " प्रिन्सेस ऑफ् तंजावर" असा किताब होता; व लॉर्ड नार्थब्रुक याच्या कारकीर्दीत ( कारकीर्द इ. सन १८७२ |१८७६. ) त्यावेळचा मद्रास येथील गव्हर्नर लॉर्ड होबर्ट याच्या शिफारशीवरून, तिला तेरा तोफांची सलामी देण्यांत आली होती. शिवाजीराजे याच्या या मुलीचा पुत्रवंश, व बहिणीचा वंश सांप्रत तंजावर येथे आहे. ब्रिटिशसरकारानें इ. सन १८५५ मध्ये तंजावर येथील सर्व राण्या व राजघराण्यांतील आससंबंधी लोक यांना ज्यांच्या त्यांच्या दर्जाप्रमाणे नेमणुका करून दिल्या होत्या, व इ. सन १८६० मध्ये ५४२८२० रुपयांची तैनात तंजावरच्या राजवाड्याकडे खर्ची पडत होती तथापि राजघराण्यांतील पुष्कळ लोक आतांपर्यंत कालवश झाल्यानें आजतागायत ही रक्कम पुष्कळच कमी कमी होत आलेली आहे. तंजावरची राजकन्या विजय- मोहना मुक्तंबाबाईसाहेब हिला एक कन्या होती. ती बडोदे संस्थानचे सध्याचे अधिपति श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड सेनाखासखेल समशेर