पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०७)

याच्याबरोबर तह केला; ( ता० २५ जून इ० सन १७४९). इंग्रजांस देवकोटा व त्याच्या आसपासचा ३१५०० रुपये उत्पन्नाचा मुलूख व लढा- ईच्या खर्चाबद्दल एक लक्ष रुपये दिले व शहाजीनें दरसाल चार हजारांची नेमणूक घेऊन इंग्रजांच्या ताब्यांत रहावे असे ठरलें. त्याप्रमाणे इंग्रजांनी शहाजीस मद्रास येथील सेंट जार्जच्या किल्लयामध्ये प्रतिबंधांत ठेविलें, परंतु तेथून तो पुढे पळाला व कायमचा बेपत्ता झाला.

 अशा रीतीने इंग्रजांनी शहाजीचा पक्ष सोडून, त्यासच उलट प्रतिबंधांत ठेविलें, इतकेंच नाही, तर चंदासाहेबाने तंजावरवर हल्ला केला असतां प्रता- पसिंहास मदत करण्याचेही त्यांनी कबूल केले; आणि अशा रीतीनें एतद्देशीय राज्यकर्त्यांच्या मदतीस आपल्या फौजा देण्याचा प्रघात इंग्रजांनी प्रथम सुरूं केला. ह्यापूर्वी इंग्रजांनी एतद्देशीय राजेराजवाड्यांच्या मदतीस आप- आपली सैन्यें दिली होती. परंतु इंग्रजफेचाचे उघड उघड युद्ध सुरूं अस ल्यामुळे उभयतचिंही ते करणे गैरशिस्त म्हणतां येत नव्हते. पण युद्धसमाप्ती झाल्यावर इंग्रजांचे हे करणे गैर होते. या बाबतीत लायल म्हणतो हु“उलट-


 S......It must be admitted that the first who yielded to this temptation were the English, when they took up the cause of a Raja, who had been expelled by his brother from the Maratha Kingdom of Tanjore. But the expedition sent to reinstate him managed matters so badly that the Company were well content to withdraw it on payment of their war expenditure in addition to a small cession of land. This was not only a military failure but a political blunder; since the Tanjore intervention furnished Dupleix with an excellent precedent for taking part in the quarrels of the native rulers, precisely at a moment when he was meditating similar designs of a much more important and far reaching character..." ( See, Lyall's “British Dominion in India. " Page 90 )