पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९ )

निंबाळकर यांजकडे गेला, व त्याच्या आश्रयास राहून, आपल्या कर्तृत्वानें व परा- क्रमानें त्या ठिकाणी त्यानें उत्तम लौकिक संपादन केला; तेव्हां जगपाळरावानें आपली बहीण दिपाबाई हिच्याशीं मालोजीचा विवाह करून दिला; त्यानंतर इ. सन १५७७ मध्ये जाधवरावानें मालोजीस मूर्तुजा निजामशाहा यांस भेट- विलें, व बादशाहाजवळ त्याची मोठी शिफारस करून त्यास त्याने निजाम- शाही सैन्यांत शिलेदारी देवविली; X यावरून मालोजी हा जगपाळराव निंबाळ- कराकडे गेला होता, तरी त्यानें जाधवरावाचा आश्रय कायम ठेविला होता, हैं उघड होतें.


नागपूरकर अप्पासाहेब भोसले, यांस जाऊन मिळण्याचा त्याचा बेत फसून त्यास तसेच उत्तरेकडेस पळून जाणे भाग पडले.

 x या बाबतीत वर दिलेल्या हकीकतीहून थोडीशी निराळी हकीकत उप- लब्ध झाली आहे, ती अशी की,

 शिखर सिंघणापूर येथे श्रीशंभू महादेवाचें एक जाज्वल्य साक्षात्कारी, पुरातन व प्रसिद्ध देवस्थान आहे; यादव ऊर्फ जाधव घराण्यांतील राजा सिंघण हा कोल्हापूरच्या राजाशी लढत असतो त्याचा मुक्काम साताव्याच्या आसपास होता; त्यावेळी त्यानें खटाव तालुक्यांतील मायणी या गांवी दोन ओढ्यांच्या संगमावर " संगमेश्वर " या नांवाचें एक महादेवाचें देवालय बांधिलें, व भूषणगडचा किल्ला बांधून, श्रीशंभू महादेवाच्या देवालयाजवळ सिंघणापूर हे गांव वसविलें; "सिंघणापूरचा महादेव" हे अनेक मराठा कुळांचे आराध्य दैवत आहे; या ठिकाणी मालोजी व विठोजी हे उभयतां बंधू आपल्या मातोश्री समावेत राहून श्रीशंभूमहादेवाची सेवा एकनिष्ठेनें करून कालक्रमणा करीत होते; त्यावेळी त्यांना श्रीचा दृष्टांत झाला; त्यावरून हे उभयतां बंधु फलटण येथें येऊन जगपाळराव निंबाळकर यांस भेटले, व त्याच्या पदरी बाराशें होनांची तैनात मान्य करून इ० सन १५७७ या वर्षी नौकरीस राहिले; हे उभयतांही बंधू मोठे शूर व साहसी असून, श्रीशंभू महादेवाच्या एका जुन्या बखरीमध्ये त्यांच्या अलौकिक पराक्रमाचें साम वर्णन केलेलें आहे; आणि त्यांत अतिशयोक्तीचा कांहीं भाग आहे, असे मानून तो वजा केला तरी मालोजी व विठोजी हे उभयतां बंधू मोठे साहसी, शूर व