पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५६ )

शिवाय प्रतिकाराला तयार होत नाहीत; दुःखें सहन करीत राहतात, पण त्यांची प्रतिकाराची बुद्धि जागी होत नाहीं; परंतु स्वराज्य संस्थापनेच्या कार्याला प्रारंभ करितांना तें कार्य शेकडा शंभर हिश्शांनी सिद्धीस जाईल की नाहीं, याचा विचार करीत तो बसला नाहीं; यशाच्या मोजमापावर आपल्या कर्तव्यनिष्ठेचें प्रमाण त्यानें ठरविले नाही. शहाजीचा चुलत भाऊ खेळोजी याला अवरंगझेबानें ठार मारिलें, ही गोष्ट शिवाजीस माहीत होती; त्यावेळीं ( इ० सन १७३९; आक्टोबर ) तो अजमार्से बारा वर्षांचा होता; हुसेन निजामशाद्दा यानें आपला आजा लुकजी जाधवराव व मामा अचलोजो यांना ठार मारिलें, ही गोष्ट शिवाजीस माहीत होती; त्या- वेळीं ( इ० सन १६२९ मध्ये ) शिवाजी दोन वर्षांचा होता; शहाजीवरील प्राणसंकटांची शिवाजीची आठवण ताजी होती; अशा रीतीने आपल्याच नात्यांतील कर्त्या पुरुषांचे झालेले वध व वडिलांना भोगाव्या लागलेल्या आपत्ति यामुळे, एखादा साधारण मनुष्य तर असले अचाट राष्ट्रकार्य अंगावर घेण्याच्या भानगडींत, सर्व नाशाचा प्रसंग स्वतःवर आल्याशिवाय कधीच पडला नसता; परंतु शिवाजी ही विभूती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची होती; स्वराज्य संस्थापना करण्याचें अलौकिक कार्य हाती घेणाऱ्या या विभूतीला राष्ट्राच्या सर्व नाशाचाही प्रसंग उत्पन्न होण्याची जरुरी लागली नाही. राष्टाचा सर्व नाश होईपर्यंत ही विभूती स्वस्त बसली नाहीं; तिला स्वस्थ बसवले नाहीं. शिवाजीने स्वतः कष्ट सोसून व मार्गदर्शकत्व परकरून जनतेची प्रति काराची बुद्धि जागृत केली. त्या बुद्धीला कायमपणा आणून, ती योग्य नेतृत्वाखाली व नियंत्रणाखाली संघटितपणे उद्दिष्ट कार्यास लावून, उदरंभरण हेच आपले ध्येय, व हीच आपल्या जन्माची इतिकर्तव्यता, अशा बुद्धीच्या गुलामांच्या राष्ट्रांतील लोकांच्या भाकरीशी काळजी वाहण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन महाराष्ट्राचा संसार सुखाचा बनविला. स्वतःच्या राजकीय उन्नती अठर्टी राज्यकर्त्यांच्या मेहेरबानांवर अवलंबून न राहता स्वतःचे कर्तृत्व व लोकसंग्रहाचें पाठबळ, यांवर भिस्त ठेवून प्रयत्न केल्यास, व करीत राहिल्यास राष्ट्राला आज नाहीं उद्यां, केव्हां तरी सुखाचे व स्वातंत्र्याचे दिवस खास दिसतील, ही गोष्ट शिवाजीनें स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या
.