पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )

डावरगांव, निलजगांव, गिरवली, या गांवच्या पाटिलक्या दिल्या, त्या त्याच्या घराण्यांत आजतागायत चालत आहेत.

 लुकजी व भुताजी हे दोघे बंधू शिंदखेड येथें प्रथम येत असतां सट- वाजी व० राघोजी या नांवाच्या एका वारकाचे शेतांत उतरले; व भोज- नोत्तर एका झाडाखाल लुकजी निजला. दुसरे लोक दुसन्या झाडाखाली निजले; तो लुकजीवर एका नागानें फणा धरली, हे त्या शेताचा मालक सटवाजी वारीक याने पाहिलें; व हा कोणी तरी मोठा मनुष्य होणार, हे ओळखून तो येऊन लुकजीचे पाय दात्रीत बसला; आणि लुकजी जागा झाल्यावर त्यास लवून मुजरा करून तो म्हणाला, " तुम्हांस तुमच्या कामांत यश येईल; तुमचा मोठा भाग्योदय होईल; " आणि घडलेली हकीगत त्यास सांगून, व मोठ्या धूर्तपणाच्या गोष्टी बोलून त्यानें लुकजी जवळून असें वचन मिळविले की, " माझा भाग्योदय झाल्यास मी तुला विसरणार नाही. " त्याप्रमाणे भावी काळांत लुकजीचा भाग्योदय झाल्यावर त्यानें त्या वारकास 'एक मुंडाचें शेत इनाम दिलें; व शिंदखेड येथील देशमुखीचा मान दिला; शिंदखेड व देऊळगांव राजा येथील सटवाजांचे वंशज वारीक अद्यापिहि मशाल धरीत नाहीत; व “ देशमुखीचा मान " हे त्याचे कारण असे सांगतात.

 शिंदखेडकडील बंदोबस्त करून जाधवराव दौलताबादेस निजामशहाकडे गेला; व त्याच्या सन्निध राहून त्यानें अनेक पराक्रम गाजविले. त्यामुळे निजामशादानें खूष होऊन त्यास त्याच्या खासगत खर्चासाठी शिंदखेड, पड- तूर, खेरडे, ( हा गांव तीनशे वर्षे जाधवरावाच्या जहागिरीत होता; तेथें मानसिंग जाधवरावाच्या नांवाची "मानसिंग दरवाजा" या नांवाची वेस अद्याप अस्तित्वांत आहे. ) व मेहकर वगैरे प्रांत जहागीर दिले, व फौज ठेवण्यास सांगून, वैजापूर गांडापूर, फुलंबरी, कन्नड, दाऊरवाडी, पैठण, मेहकर, पर- गणा लोणार, रिसवड, बामनी, पिंपळगांव, कु-हे, मंगरूळ वगैरे महाल फौजेच्या खर्चासाठीं तोडून दिले.

 अशा रीतीनें जाधवरावाचा निजामशाहाश सलोखा होत होत त्या उभ न्यतांमध्ये पुढे इतक्या परमावधीचा घरोबा झाला कीं, जाधवरावाच्या कुटुं-