पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३७ )

नौकराँत राहिल्यानंतर याच्या मनोवृत्तींत कसा व कोणता फरक झाला, है पाहणे आवश्यक आहे.

 शहाजी विजापूरकरांच्या नोकरीत राहिल्यानंतर " मुसलमानांची सत्ता हिंदुस्थानांत प्रबळ असून ती उलथून पाडणें आपल्या अटोक्याबाहेरचें आहे; " अशी त्याची पूर्ण खात्री झाली; आ ण सेवाधर्म पत्करून व यवनांची सेवा करूनच, कोणत्याही हिंदु पराक्रमी सरदारास प्राप्त करून घेणे शक्य असलेलें वैभव आपण प्राप्त करून घेणे हेच आपल्या आयुष्यांतील इतिकर्तव्य आहे, अशी त्याची ठाम समजूत बनली. " यवनांचा द्वेष अथवा तिरस्कार करूं नये; " या शहाजीतर्फे, शहाजीच्याच सांगण्यावरून करण्यांत आलेल्या उपदेशावरून ही गोष्ट अगर्दीच उघड होतें कीं, शहाजी आपल्या हितशत्रूबद्दल मनांतून कदाचित सारखा जळत असला तरी सुद्धां लौकिकदृष्टया त्यानें आदिलशाही सत्तेविरुद्ध द्वेष किंवा तिरस्कार कधींही दाखविला नाहीं; उलट तो कर्नाटक प्रांतांत बहुतेक स्वतंत्र होता तरी विजापूरकरांचा श्रेष्ठ अधिकार त्याने कधीही झुगारून दिला नाहीं. शेवटपर्यंत तो आदिलशाहास “ खाविंद " असेच म्हणत राहिला, व त्याच्याच नांवावर शहाजीनें कर्नाटकमध्ये आपले महत्त्व वृद्धिंगत केलें.

 शहाजीनें शिवाजीस जो उपदेश केला, त्यावरूनही शहाजीच्या मनः- स्थितीचा पुष्कळच बोध होतो. हिंदुस्थानांतील मुसलमानांची प्रबळ सत्ता उलथून पाडणें, ही गोष्ट ईश्वराधीन आहे, आपल्या हातची नाही, व ईश्वरी सत्तेनेच ती हिंदुस्थानांत अस्तित्वांत व प्रबळ असल्यामुळे त्याबद्दल विषाद मानणे योग्य नाहीं, अशी शहाजीची समजूत होती; व तिला अनुसरूनच, बादशाहास दरबारी पद्धतीनें लवून कुरनिसात करीत जावा; " असा त्याने शिवाजीस उपदेश केला होता. शिवाय, शहाजीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला (शहाजीला ) ह्या सर्व गोष्टी समजत होत्या; परंतु " मुसलमानी सत्तेशीं आम्ही फटकून वागलों असतो, तर आम्हाला हे वैमवाचे दिवस दिसले नसते, " असे त्याचे शिवाजीस सांगणे होतें; म्हणजे शिवाजीचे वर्तन योग्य, व तेजस्वीपणाचे आहे, अशी शहाजीची खाली असूनही, तें. काळवेळप्रसंगानुरूप नाही, असे त्याचें म्हणणे होतें. प्रसंग पाहून आपल्या