पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०४ )


पावली. शहाजी राजे याची दुसरी स्त्री नामें तुकाबाई; ( संभाजी मोहिते याची कन्या; ) प्रसिद्ध आदिलशाही सरदार बाजी मोहिते, "अमीरराव " पोगरवाडीकर याची बहीण; लग्न इ० सन १६३० मध्ये विजापूर येथे; तिचे पोटीं एक पुत्र; नामें एकोजी ऊर्फ व्यंकोजी राजे; तंजावरच्या राज्याचा संस्थापक; शहाजीनें इ० सन १६३६ पर्यंत निरनिराळी प्रचंड कारस्थाने करून निजामशाही जगविण्याचा प्रयत्न केला; व त्यानंतर ३० सन १६३८ मध्ये आदिलशाही नौक- रीत दाखल झाला. इ० सन १६३८-१६४७ पर्यंत कर्नाटक प्रांतांत त्याने आपले राजकीय महत्व, व आदिलशाही स्थापन केली ; इ० सन १६४८ मध्ये त्यास बाजी घोरपडे यानें दग्याने पकडले, व विजापूर येथे त्यास कारागृहवास घडला; इ० सन १६४९ मध्ये बंधमुक्तता झाली; व कर्नाटकमध्ये परत गेला; व त्याच वर्षी आदिलशाहाच्या हुकु- मानें विजापूर येथे येऊन, अजमासे चार वर्षे तेथे राहिला; व इ० सन १६५३ मध्ये पुन्हां कर्नाटक प्रांती परत गेला; त्या वेळेपासून इ० सन १६६१ पर्यंत कर्नाटक प्रांती मुक्काम; व विशेष महत्व स्थापना; इ० सन १६६१ मध्ये, आदिलशाहाच्या आग्रहावरून, शिवा- जीची भेट घेण्यास कर्नाटक प्रांतांतून निघून महाराष्ट्रांत आला; व शिवाजीची भेट घेऊन, तो व आदिलशाहा यांच्यामध्ये तह घडवून आणला; ( इ० सन १६६२ ). तो इ० सन १६६३ मध्यें, परत जाण्यास निघून, पहिल्याने विजापूर येथे जाऊन, अली अदिलशाहास भेटून कर्नाटक प्रांती परत गेला; याच वर्षी मार्च महिन्यामध्यें अल्ली आदिलशाहा स्वतः कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्याकरितां विजापूर येथून निघाला; व तुंगभद्रा नदीस मिळणाऱ्या वर्धा नदांच्या कांठी त्याचा तळ असतांना, त्याच्या " आपणांस ताबडतोब येऊन भेटा; या हुकुमाप्रमाणे, शहाजी त्यास जलदीने प्रवास करीत येऊन भेटला; तेव्हां बहलोल व शहाजी या उभयताही सरदारांना, त्याने ताबडतोब पकडून त्यांना बेड्या घालून प्रतिबंधांत ठेविलें; ( इ० सन १६६३;

[ वंशावळ पुढे चालूं]