पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९८)

प्रमाणे इत्तीची तुला करून ते रुपें ब्राम्हणांना दान करण्यांत आले; व त्या वेळेपासून त्याचे पूर्वीचें नागरगांव हें नांव मार्गे पडून त्यास तुळापूर * हें नांव प्राप्त झाले.

 शहाजीनें अदिलशाही सैन्याच्या मदतीने निजामशाहीतील पुष्कळ प्रदेश व किल्ले आपल्या इस्तगत करून घेतले; परंतु भीमगड हे ठिकाण राजधा- नीस योग्य नसल्यामुळे, जुन्नर येथें राजधानी न्यावी, असा त्यानें विचार केला. यावेळी श्रीनिवासराव हा तेथील किल्लेदार असून तो शहाजीचा स्नेही


 *याच तुळापूर गांवीं अवरंगझेबानें छत्रपति संभाजी याचा वध केला असून (ता. ११ मार्च इ. सन १६८९; मनूची. ) त्याठिकाणी त्याची समाधी जीर्ण स्थितीत आहे. ( भा. इ. सं. वृत्त; १८३४-६९). तुळापूर गांवच्या अग्रहारांसंबंधीच्या शाहुकालीन पत्रोत खालील मजकूर आहे; मुरार शवानें अग्रहार इनाम करून देऊन विजापूरकर पादशाहाच पत्र करून दिलीं; "त्याप्रमाणे महाराज राजेश्री शाहाजी राजे व थोरले कैलासवासी महाराज (छत्रपति शिवाजी ) यांनी पत्रे देऊन मोजे मजकूर पूर्ववत प्रमाणे समस्त ब्राम्हणांस अग्रहार इनाम चालविला; त्या उपरी आलमगीर बादशाहाचा मुकाम तुळापूर मजकुरीं होता ते समयीं समस्त ब्राम्हणांनी पूर्वील पत्रे पाद- शाहाची दाखवून अर्ज केला, त्यावरून आलमगीर पातशाहांनी दिवाणी पर वाना करून देऊन मौजे मजकूर समस्त ब्राम्हणांस इनाम चालविला व महा- राज राजश्री काकासाहेब ( छत्रपति राजाराम) यांनी इनाम चालविला. कुल- बाब कुलवानू देखील सर देशमूख व इनाम तिजाई इलोपट्टी व पेस्तरपट्टी. खेरीज हकदार करून इनाम करून दिल्हा " म्हणजे शहाजीनेही या बाब तीत ब्राम्हणांना पत्र दिलें होतें, हे सिद्ध होतें; व पुढील काळांत शिवाजी, राजा- राम व शाहू यांनीही तो अग्रहार चालू ठेविला असे स्पष्ट होतें; व या अप्र हारपत्रावरूनच हिंदु व हिंदुधर्मद्वेष्टा म्हणविणा-या प्रसिद्ध अवरंगझेबानें दिवाणी परवाना करून देऊन तुळापूर गांव अग्रहार म्हणून समस्त ब्राम्हणांस इनाम चालविला, ही विशेष महत्वाची व विचारांत घेण्यासारखी गोष्टही स्पष्टपणें निदर्शनास येते.