पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





उपसर्ग विचार


 जी अव्ययरूप अक्षरे धातूच्या मागे लागून बऱ्याचदा धातूचा अर्थ बदलवितात त्याला उपसर्ग म्हणतात. 'उपसर्ग' हे स्वतंत्रपणे केव्हाच येऊ शकत नाहीत. उपसर्गांना स्वत:चा अर्थ नसून ते नामे आणि क्रियापदे यांचा जास्त अर्थ दाखविणारी केवळ चिह्ने आहेत.
गाठ यांच्या मते उपसर्ग ही पदे असून त्यांचे विविध प्रकारचे अर्थ होतात. अशी ही दोन उपसर्गाबद्दलची परस्पर विरोधी मते आहेत. उपसर्ग पदे नसल्यामुळे त्यांना अर्थ हा असलाच पाहिजे. तात्पर्य नामे आणि क्रियापदे यांचा अर्थ बदलणे हा उपसर्गाचा अर्थ आहे म्हणूनच उपसर्गांना स्वत:चा अर्थ आहे. 'नामाख्यातयोः अर्थविकरणम।' शब्द कोशातून उपसर्ग घटीत शब्दांची अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत.
१) आ
 'आ' या उपसर्गाचा अर्थ 'खाली', 'निम्न' असा होतो. उदा. 'आ गच्छ, (देवा तू.) ये, पण क्रियापदांना 'आ' लावल्यास त्या क्रियापदाचा अर्थ उलट होतो. उदा. गच्छ (जा) आ+गच्छ (ये) नय म्हणजे 'ने', आ+नय म्हणजे 'आण' असा अर्थ होतो. 'आ' उपसर्गामुळे विरुद्ध अर्थ होतो. आगमन (येणे) शिवाय पर्यंत, समाविष्ट, मर्यादा, अभिवृद्धीदर्शक हा 'आ' उपसर्ग आहे.
२) प्र आणि परा

 प्र आणि परा या उपसर्गांनी उलट अर्थ होतो. उदा. :- प्रपतेत म्हणजे वर जाईल, परापतन्ति म्हणजे वर जातात. 'प्र' उपसर्ग अधिक्य सुचवितो. उदा. : प्रताप, प्रकर्ष, प्रभाव, प्रगती. 'परा' ने उलट अर्थ होतो. उदा. परावर्तन. (आधिक्य) प्रकोप, प्रभाव, प्रपिता (उलट) पराजय, पराभव



४१...