Jump to content

पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





 आ) विशेषनाम किंवा महत्त्वाचा शब्द म्हणून उठाव देण्यासाठी एकेरी अवतरण चिह्न ('....') वापरतात.
  उदा.महाभारतातील 'एकलव्य',खांडेकरांनी 'क्रौचवध', 'ययाति' इत्यादी कांदबऱ्या लिहिल्या आहेत.
मोठ्या प्रदीर्घ अवतरणासाठी साधारणपणे अशी दुहेरी व अल्पाक्षर छोट्या रचनांसाठी एकेरी अवतरण देण्याची प्रथा आढळते. मात्र याबाबत नक्की नियम आढळत नाही. मुळात दुहेरी अवतारणाचीच प्रथा आहे. एकेरी अवतरण साधारणपणे एकेका शब्दासाठीच योजिले जाते.
८) संयोग चिह्न (-)
 अ) दोन शब्द जोडताना संयोग-चिह्न (-) वापरतात.
  उदा. प्रेम-विवाह, ग्राहक-भांडार
 आ) एका ओळीत वाक्य लिहितांना शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयोग (-) हे चिह्न वापरतात. उदा. विद्या-पीठ परीक्षांसाठी केंद्रावर चौकशी करावी. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी वेळापत्रकासाठी महाविद्या-
लयात चौकशी करावी.
९) अपसरण (-)
 अ) बोलतांना विचारमालिका तुटल्यास अपसरण (-) हे चिह्न वापरतात. उदा.नाटकातील संवाद : मी सर्व प्रयत्न केले, पण -

 आ) काही स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास हे अपसरण चिह्न स्पष्टीकरण चिह्न म्हणूनही योजितात. उदा. ती विद्यार्थिनी - जिने प्रथम पारितोषिक मिळविले, ती आपल्या महाविद्यालयात शिकत आहे.



३६...