Jump to content

पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




४) हिन्दी भाषेच्या संपर्कामुळे होणाऱ्या चुका.
 सफेद (सफेत), दूसरा (दुसरा), ज्यादा (जादा)
५) विसर्गाच्या संभ्रमातून होणाऱ्या चुका.
 अंध:कार (अंधकार), अंतस्थ (अंतःस्थ), मातोश्री (मातु:श्री)
६) ष्ट - ठच्या संभ्रमातून होणाऱ्या चुका.
 उत्कृष्ठ (उत्कृष्ट), कनिष्ट (कनिष्ठ), विशिष्ठ (विशिष्ट).
७) श-ष-स च्या संभ्रमातून होणाऱ्या चुका.
 विषद (विशद), सुश्रूशा (शुश्रुषा), विषेश (विशेष)
८) ऊ-वू च्या संभ्रमातून होणाऱ्या चुका.
 जेऊन (जेवून), धुवून (धुऊन), गावुन (गाऊन).
९) वर्णविपर्ययातून होणाऱ्या चुका.
 चिटकविणे (चिकटविणे), सहाजिक (साहजिक), फाकट (फाटक).
१०) अ-आ च्या संभ्रमातून होणाऱ्या चुका.
 आर्वाचीन (अर्वाचीन), अहेर (आहेर), अवश्यक (आवश्यक).
११) संस्कृतातून आलेले हस्व इकारान्त व उकारान्त (तत्सम) शब्द मराठीत नवीन नियमाप्रमाणे दीर्घ लिहावेत. सामासिक शब्दात पूर्वपद असताना मात्र ते हस्वच राहतात.
उदा. भूमिपूजन, प्रीतिभोज, ऋषिकुमार, इत्यादी.

काही लक्षणीय शब्दांचा निधी

१) उपसर्गघटित शब्दांत व्हस्व इकार व उकार, व्हस्व राहतात.
 अति-अतिस्नेह, अतिरेक, अतिशयोक्ती, अतिशय.

 अधि-अधिकार, अधिमती, अधिदैवत.



१८...