Jump to content

पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असो भलतैसा । परंतु नाम सांडूं नये ॥ ५० ॥ नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेशी विश्वेश्वर । वाराणसी मुक्ति क्षेत्र । रामनामें करूनी ॥५१॥ उफराट्या नामासाठीं । वाल्मीक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ ५२ ॥ हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातांपासून सुटला । नारायणनामें पावन झाला । अजामीळ ॥ ५३ ॥ नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले। महापापी तेच झाले । परम पवित्र ॥५४॥ परमेश्वराची अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें । नाम स्मरतां यम । बाधिजेना ॥ ५५ ॥ नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्य शरीर । नाना दोषाचे गिरिवर । रामनामें नासती ॥ ५६ ॥ अगाध महिमा नवचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हालाहलापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ ५७ ॥ चहूं वास नामाधिकार । नामी नाही लहान थोर । जड मूढ पैलपार । पावती नामें ॥५८॥ DISTER दासन मनाघ. भक्ति-भक्त. साली सहा जाई. श्रद्धा-भक्ति-भक्त. एकनाथ:- ओव्या. TIM E भक्तीपाशी यश कीर्ती । भक्तीपाशी शांति विरक्ती । भक्तीपाशी ब्रह्मस्थिति । खानंदें वर्तती सर्व कर्मी ॥ १॥ भक्तीस विकला भगवंत । भक्ताचें उच्छिष्ट वयें काढीत । रणांगणी घोडे धूत । शेखी होत द्वारपाळ ॥ २ ॥ जेथे राहती भगवद्भक्त । तें भूमंडळ होय पुनीत । कीर्तनसुखें डुल्लत । जग उद्धरत त्याचेनि ॥३॥ आनंदें करिती हरिकीर्तन । नामासवें गर्जे गगन । श्रोतया वक्तयाचे अतर क्षाळण । न लागतां क्षण मैं होय ॥ ४ ॥ क्षाढलेनिः अंतरें । परमानंद अंतरी 1-भरे । चित्त चित्तपणा विसरे । न देखे दुसरे जगामाजी ॥ ५ ॥ जगाचे ठायीं विषमता । चित्तपणे भासवी चित्ता । तेणें श्रवण कीर्तन करितां । स्वये भगवता गतलें ॥६॥ तेणें अंतर सुखावे तत्त्वतां । तिलम जगामाजी पाहतां । बुडाला विषमाची वार्ता । चिदाभासता सर्वत्र ॥ ७ ॥ जेथें दुजेपणासी भान । तेंचि