Jump to content

पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आलेली आहेत, यावरच आपले लक्ष केंद्रित झालेले असते. आपण प्रथम त्यात आपले नाव आलेले आहे किंवा नाही हे पाहती. फोटोतसुद्धा आपण पूर्ण, अर्धवट का होईना पण कुठे आहोत, हे पाहण्यासाठी धडपडतो. पण यापेक्षा सतत वाचणाऱ्याचे भान वेधून त्याला वृत्तांतात आवाहन केलेले असले पाहिजे. वाचकाला स्वतः विषयीच्या, स्वतःचे हितसंबंध ज्यात गुंतलेले आहेत अशा किंवा स्वतःला परिचित असलेल्या गोष्टींविषयींच्या वृत्तांतात. विशेष रस असतो. अर्थातच या वृत्तांतास वैयक्तिक व मर्यादित वाचकवर्ग असतो. वृत्तांताला वाचनीयता येण्यासाठी वेळ, अधिकार, महत्त्व आणि स्वारस्य इत्यादी गोष्टी त्यात असल्या पाहिजेत. यातुनच वृत्तांताला महत्त्व प्राप्त होते. वृत्तांत - लेखनाचा मार्ग वृत्तांत-लेखनात पुढील गोष्टींचा समावेश करता येईल. १) वैयक्तिक अनुभवांचे कथन उदा. : पत्रमाध्यमातून एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राला लिहिलेले पत्र - ज्यात दिवाळी सुटीत विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या, भरपूर प्रवास केला या वृत्तांताचा समावेश करता येईल. शिवाय यात आपल्या मित्राने सुटीत केलेली मजा पुन्हा इतरांना आपण सांगतो, तेही वृत्तांत-कथनच होईल. २) विविध प्रसंगी मान्यवरांनी केलेल्या भाषणांचे वृत्तांत. उदा. : महाविद्यालय सुरू होतांना प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेले अभिभाषण, स्नेहसंमेलनप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी गाजविलेले भाषण, वक्तृत्त्व स्पर्धेच्या पारितोषिक – वितरण Ð ३६