पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भूमिका मराठी शुद्धलेखन शुद्धलेखन ही तशी मुळात अवघड गोष्ट नाहीच. पण आपल्याकडे व्याकरण आणि शुद्धलेखन म्हटले की त्याचा फार मोठा धाक निर्माण होतो, 'बाऊ' केला जातो. पण थोडे मनावर घेतले, काळजीपूर्वक नियम लक्षात घेतले, विरामचिन्हे समजावून घेतली की लेखन शुद्धीची चिंता दूर होते. उलट शुद्ध गद्यलेखन करता येते आणि डोळस जाणकार मराठी माणसालाही तुमच्या लेखनातील उणिवा, दोष दाखवायला जागा राहत नाही. मात्र त्यासाठी येथे केलेले शुद्धलेखनाचे विवेचन समजावून घेणे अगत्याचे आहे. त्या अनुषंगाने दिलेले स्वाध्याय मनःपूर्वक आणि परिश्रम- पूर्वक सोडविणे आवश्यक आहे. शुद्धलेखनातील शुद्धाशुद्धता शुद्धलेखन हा व्याकरणाचाच एक भाग असल्यामुळे व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले लेखन म्हणजेच शुद्ध- लेखन होय. आपण नेहमीच लिहीत असतांना शब्दलेखनात अनेक चुका करीत असतो, किंवा कळत नकळत या चुका आपल्या हातून होत असतात. चुकीची जाणिवही कित्येकदा लिहिणाऱ्याला १