Jump to content

पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ ३] सिद्ध नागार्जुन वे त्याचे ग्रंथ. ६९ हे यचा His of Hindu cheriesty Vol. JI, हा ग्रंथ नुकताच प्रसिध्द झालेला हाती आला. त्यांत त्यांनी नागार्जुना विषयींच्या सर्व बाध्द परंपरा--तिबेटी व इतर वौध्द ग्रंथांवरून आणि तारानाथांच्या बोध्द धर्माच्या इतिहासावरून संगृहीत केलेल्या आहेत. इंग्रजीतून या संग्रहास किंवा हा संश्रह करण्यास जितकी साधनांच्या दृष्टीने सुलभता आहे, तितकी मराठींतून नाही, हे उवेडच आहे. म्हणूनच, मुख्य मुख्य गोष्टींचा थोडक्यांत ( वरील पुस्तकावरूनच ) या लेखांत मराठींत उल्लेख करितों. । नागार्जुन हा माध्यमिक मताचा प्रवर्तक असल्यामुळे, उत्तरेकडच्या बौध्द ग्रंथांतून त्याजावेषयींच्या कथा, त्याच्या अद्भुत सिद्ध, व त्याने केलेले चमत्कार वगैरे विषयी पुष्कळ उल्लेख आहेत. माध्यमिक मताचा मुख्य सिद्धांत सर्व शून्य असा आहे. हुएनत्स्यांगने देव, अश्वघोंघ, कुमारलब्ध व नागार्जुन या चौघांस • चतुर्दशेचे चार सूर्य' असे म्हटलेले आहे. ( Julians texts, ५ ol ii, p. 214 ) इ. स. ४०१४०९ च्या इतक्या प्राचीन काळीं नागार्जुन बोधिसत्वाचे एक चरित्र चीनीभाषेत भाषांतरित झालेले होते. (Bu11. Nanjio's Catalogue. Ap. I, No, 3. ) ह्या चिनी भाषेतील भाषांतराचे मूळ इकडील एकाइ । संस्कृत ग्रंथ असला पाहिजे, हे उघड आहे. तो निदान १ ००३१६० वर्षे तरी प्राचीनतर असला पाहिजे; आणि या ग्रंथांहून १००।१५० वर्षे पूर्वी सिध्द नागार्जुन स्वतः होऊन गेला असला पाहिजे हे उघड होते. यावरून मागे आम्हीं जो इ. स. १०० च्या सुमाराचा नागार्जुनाचा काळ ठराविला तो बरोबरच आहे हे कळून येईल, तारानाथ या तिबेटी भिलने सतराव्या शतकाच्या प्रारंभी एक बौद्ध धर्माचा इतिहास लिहिलेला आहे. यांत त्यांनी सिद्ध नागार्जुनाविषयों आपल्या वेळी प्रचलित असलेल्या सर्व दंतकथांचा संग्रह करून ठेविलेला आहे. मोठ्या लोकांबद्दलच्या आख्या यिकाही कालांतरा कशा मोठ्या होत जातात, हें ज्यांच्या लक्षांत आहे, त्यांनी जैन परंपरांप्रमाण, या बौद्ध परंपरांचही, ऐतिहासिक निष्कर्षाच्या