Jump to content

पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/338

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. खासगी प्रयत्नांपासून विशेष फलप्राप्ति होणार नाही, अशी माझी खात्री आहे. हल्ली ख्रिस्ती धर्मासंबंधाचे धार्मिक शिक्षण मात्र वस्तुतः दिले जात आहे. सरकारी त-हेने मान्य होणारा व सरकारांतून साहाय्य मिळण्यालायक धर्म काय तो तोच, असें ठरविले जाईल, तरच हल्लींची ही वस्तुस्थिती ठीक आहे. धर्मशिक्षणाच्या आवश्यकतेविषयीं सरकाराकडून जी उदासीन वृत्ती धारण करण्यात येत आहे ती मिशनरी लोकांच्या वजनाचेच फळ आहे, असा सामान्य लोकांचा ग्रह होतो. पण सरकारचा खरा हेतु काय आहे, ही गोष्ट, या विषयावर यत्किंचितही विचार करणाऱ्यांच्या तेव्हांच लक्षात येते. मिशनरी लोक करीत असलेल्या कामगिरीविरुद्ध, माझें कांहींच म्हणणे नाही. उलट हिंदुस्थानांतील सर्वसाधारण लोकांची, त्यांतूनही त्यांच्या खिस्ती बंधूची, स्थिती सुधारण्याच्या कामी त्यांच्याकडून होत असलेले प्रयत्न, मला अवगत असून त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदनच करितो. पण त्यांच्याशिवाय इतर धर्मपंथांनाही सरकारांतून सम्मती व साहाय्य मिळालेले त्यांना कितपत पसंत पडेल, याची शंका आहे. नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याच्या संबंधांत पंजाबांतील शीख व इतर काही धर्मपंथवाले प्रयत्न करीत आहेत. तसेंच दक्षिण हिंदस्थानांत कांही शाळा व कॉलेजें यांच्यामध्ये धार्मिक व नैतिक शिक्षण दिले जावें एतदर्थ खासगी लोकांकडून बरेच ३१८