Jump to content

पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. समुद्रातील सफर. प्राचीन शहरांशी मुळीच तुलना नाही. श्रीकृष्णाची द्वारावती नगरी-तिच्यांतील बागबगीचे, उपवनें, कालवे, आश्चर्यकारक राजमार्ग, घरांतील सुरेखसे सोपान, श्रीकृष्णाच्या महालांतील सहस्रमणिमय स्तंभ !-अशा या भव्य महालाच्या मानाने " सायडेनह्याम' येथील ' क्रिस्टल प्यालेस' कसा काय असेल याबद्दलची मला जिज्ञासा होती. युरोपांतील सुधारणा बहुतेक हिंदुस्थानांतूनच तिकडे गेलेली. धर्म बराचसा तिकडलाच, तत्त्वज्ञान तर निःसंशय तिकडलेच नेलेलें होय. फक्त आम्ही भयप्रद अशा काळ्यापाण्याच्या बागुलबोवाचा पाडाव केला असतां, आणि स्पेन देशांत घुसून राज्यस्थापना करणाऱ्या त्या साहसी अरब लोकांप्रमाणे जर कां आपण झालो असतो तर,आम्हीही केवढे तरी प्रचंड साम्राज्य करितों ! पण हे व्हावयाचेच नव्हतें ! यावेळी हे विस्तीर्ण ब्रिटिश साम्राज्य म्हणजे एक सर्वव्यापी, समर्थ, कनवाळू राष्ट्रमाता आहे व ती आम्हांला बरोबरीने पूर्व आणि पश्चिम, दोन्ही दिग्भागांमध्ये साम्राज्यशक्तीचा उपभोग करूं देण्याला तयार आहे, असें मी समजतों, व मनःपूर्वक तिचे स्वागत करितो. - आमच्या सफरीमध्ये आगबोट जागजागी थांबे. त्या स्थळांसंबंधाने काही लिहिण्यालायक नवी माहिती मिळावी, अशी माझी मनापासून इच्छा होती. कारण, ती स्थळे पाहून मला तसाच विलक्षण आनंद व आश्चर्य वाटले. पण मजबरोबर