Jump to content

पान:बाळमित्र भाग २.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ बाळमित्र. - कोठे आहेरे गोमाई-( सटव्याकडे बोट दाखविती.. ) बाबा, हा पहा, आपले धन्याचे मार्ग कसा उभा आहे तो. (राजारामास पाहून मोठ्या आनंदाने रामराम क- रितो.) राजा-तूं इतका लवून रामराम करूंनको; तूं मा. झा जिवलग आहेस: त्वां मला आज सर्वस्वे जी- वदान दिले. विठोजी- असे कोठे झाले आहे महाराज ९ आपून मजवर फार उपकार केले आहेत. आणि आज ही मज गरिबाची चाकरी घेतली, आणि कृपा क. रून माझे घरी आलां, हाच मला लई लाभ झा- ला. आजच्या वेळेस माझी थोडीबहुत चाकरी आपल्या दृष्टीस पडली, इतक्याने मला मोठा आ. नंद झाला आहे. राजा.- हे खरेंच, पण आझी तुजवर आजपावेतों जे उपकार केले ते व पुढे ही जे जन्मवर करूं, ते सर्व तुझ्या उपकाराच्या पासंगास देखील पुरणार नाहीत. विठोजी- असे काय ह्मणतां महाराज १ माझी काय आजची चार घडींची चाकरी, आणि आपून तर लई दिसांपून मला पोसलें आहे. पहा, हे घरदार, शे. त, वाडी, गाडा नाडा, बैल ढोर, सर्व आपल्या पुण्य प्रतापाने मला मिळाले आहे. आतां आपली