पान:बालहक्क (Balhakk).pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आम्ही हक्कासाठी लढतो ...

आम्ही हक्कासाठी लढतो गं बाई
आम्ही न्यायासाठी झटतो गं बाई
 सुर्याचा प्रकाश पुर्वेला येई
 पश्चिमेत संध्याला काळोख होई
दिवसभर पोटामागं पळतो गं बाई
मरमर करुनबी शिल्लक का नाही ?
 म्हणून हक्कासाठी लढतो गं बाई....
 डोंगराच्या पायथ्याला माझ गांव हाय
 गावत जायला रस्ताचं नाय
  यायला जायला एस टी बी नाय
  शाळातर गावापासून लांबच हाय
मग कशी माझी छकुबाई शाळेला जाई
 म्हणून हक्कासाठी लढतो गं बाई
 तिच्या न्यायासाठी झटतो गं बाई...
  कुणासंग माझी बघा तक्रार नाही
  छकुमाझी आता बघा मोठीच होई
   ऊस तोडीला जाव लागतं साताऱ्याला बाई
   गावाकडं ठेवायची भितीच राही
  पाहुण रावणं करतात लग्नाची घाई
  १८ वर्षा बिगर लगीन करायच नाही.
   असं ठणकावून सांगतात मला वर्षा ताई
   म्हणून हक्कासाठी लढतो गं बाई
   तिच्या न्यायासाठी झटतो गं बाई....
   माझ्या छकुसाठी लगते गं बाई...