Jump to content

पान:बाबुर.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ बाबुर। जाण्यावांचून दुसरा मार्ग उरला नाहीं, तेव्हां तो आपल्या दोनशे स्वारांनिशी तेथून चालता झाला. शैबानीखानास ठेचून टाकण्यास ही संधि फार चांगली होती, पण बाबुरजवळ त्याच्याशीं भर मैदानांत मुकाबला देण्यासारखें सैन्य नव्हते. नाहीतर शत्रु समोरून पळून जात असतां त्याने त्यास तसा सोडला नसता.