Jump to content

पान:बाबुर.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ बाबुर तितक्याच कृतनिश्चयाने सोडलेही. मदिरापान त्याने सोडले पण भांगेची नशा तो करीत असे. ते व्यसन त्यास शेवटपर्यंत सुटलें नाहीं. दारू त्याने सोडली पण दारूने त्याला सोडले नाही. तिची आठवण, त्यास अनेक वेळां होई. कित्येक वेळां ही इच्छा इतकी असह्य होई की, तो ढसढसा रडे; पण त्याने केलेला कृतनिश्चय इतका दांडगा होता की, तो त्यापासून मरेपर्यंत ढळला नाहीं, या एका गोष्टींतसुद्धां बाबुराचें असामान्यत्त्व दृष्टीस पडते.