Jump to content

पान:बाणभट्ट.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६२ ) स्वर्गीतून उतरणें, मार्गातील अनेक प्रकारच्या देखाव्यांचे वर्णन करणें, हिमालयाची भेट होणे, त्यानें नारदाची थोरवी वर्णन करणें, दोघांचा बराच संवाद होणे, इत्यादि गोष्टींच्या वर्णनानें पहिला समग्र अंक मरला आहे. हा पहिला अंक कुमारसंभवांतील संविधानकाहून निराळा आहे, अर्से म्हणण्यास कांहीं बाघ दिसत नाहीं. दुसन्या अंकांत वासंतिका व रंभा ह्या दोघींचें बालभाषेतील संभाषण बरें असून तें अधिकच आहे. तिसया अंकांत बृहस्पति, इंद्र व नारद यांच्या संभाषणांतहि कांहीं कमी- जास्त फेरफार केलेलाच आहे. चौथ्या अंकांत मुनिवेषधारी नंदी व जया आणि विजया, पार्वतीच्या सख्या, यांचा संवाद चांगला साधला आहे व हे प्रकरण ह्या नाटकांत अधिक आहे. पांचव्या अंकांत पार्वतीच्या विवाह- समारंभाचें वर्णन अधिक विस्तृत आहे व पार्वतीस मंगलस्नानानंतर अलंकार घातले आहेत त्यावर कवीनेंहि आपले अमोलिक अनेक अलंकार चढविले आहेत ! यांतील भूषणप्रकार कुमारसंभवांतल्यापेक्षां अधिक असून मजेदार आहे ! . कुमारसंभवांत हिमालयवर्णन, रतीचा शोक, पार्वतीची परीक्षा पाहण्याकरितां बटुरूपी शिवाचा उपदेश इत्यादि प्रकरणे अधिक विस्तृत आहेत व तीं उत्तम आहेत. याविषयी मतभेद नाहीं. आतां नारदाचें स्वर्गांतून उतरण्याच्या वेळेचें वर्णन, व शाकुन्तलां- त दुष्यंत व माताले यांच्या स्वर्गांतून उतरण्याच्या वेळच्या संवादां- तील देखाव्याचें वर्णन, यांत कांहीं ठिकाणी थोडें थोडें सादृश्य जमतें, असेंहि कोणाचे झणणे आहे. असेंच पाहत गेलें तर, कोणत्याहि ग्रंथांत कोठें तरी कोठलें थोड़ें तरी सौदृश्य जमल्यावांचून राहत नाहीं, असें मार्गे १ कुंमारसभवांत नंदी हा वसंत व मदन यांच्या आविर्भावानें उछृंखळ झालेल्या गणांस नाकावर बोट ठेवून दापीत आहे ! एवढाच संबंध आहे. ते पद्य हे होय:- " लतागृहद्वारगतोऽथ नंदी वामप्रकोष्ठार्पितहेमवेत्रः । मुखार्पितैकाङ्गुलिसंज्ञयैव माचापलायेति गणान् व्यनैपीत् ।।

)

२ कै. ० न्या. तैलंग यांचा या संबंधानें एक लेख इं० ऍ०त प्रसिद्ध झालेला आहे. ३ अनेकांच्या वर्णनाचा एकच विषय असला झणजे कांहीं ठिकाणी तरी सादृश्य जमल्याखेरीज राहत नाहीं. बृहद्योगवासिष्ठांतील वैराग्यप्रकरणांतील लक्ष्मी- च्या संबंधानें दोषकथन, व कादंबरीतील शुकनास प्रधानाच्या उपदेशांतील लक्ष्मी- -