पान:बाणभट्ट.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८ ) आली आहेत. जयदेवकवीनें ' गीतगोविंदांत ' एक्या अष्टपदींत बुद्धाचें वर्णन केले आहे. " निंदसि यज्ञविधेरहह श्रुतिजातम्- सदयहृदय दर्शितपशुघातम् । केशव धृतबुद्धशरीर जय जगदीश हरे " ॥ धृ० ॥ याचें तात्पर्य असें कीं, ईश्वरा! तूं सदय होऊन बुद्धावतार धारण करून यज्ञांत पशुहिंसा सांगितली तिचा निषेध केलास ! यावरून बुद्धाचें महत्त्व किती वाढले होतें हें लक्षांत येतें ! ख्रिस्ती शकाच्या पांचसहाशे वर्षांनंतर त्या धर्मातच अनेक मतभेद झाल्या. मुळे असो, किंवा वैदिक व जैनधर्म यांचे प्राबल्य वाढत गेल्यामुळे असो; बौद्धांस हा देश सोडून तिबेट, चीन, जपान, व सिंहलद्वीप इत्यादि ठिकाणीं जावें लागले असावें; किंवा त्या धर्माचे उपदेशक त्या त्या देशांत जाऊन त्यांनीं तेथें तेथें त्या धर्माचा प्रसार केला असावा, अर्से वाटतें. सातव्या व आठव्या शतकांत तर शबरस्वामी, कुमारिलभट्ट इ० मीमांसक व शंकरा चार्य प्रमुख वेदांती आणि समंतभद्र, प्रभाचंद्र, विद्यानंद व अकलंक इत्यादि जैनधर्माभिमानी थोर थोर विद्वान् उत्पन्न झाल्यामुळे आणि त्यांनीं बौद्धमतावर हेल्ले केल्यामुळे व त्याचप्रमाणें तदनुयायी राजे व लोक यांनी बौद्धांचा छळ केल्यामुळे त्यांचा इकडे बराच मोड झाला असावा. तथापि पुढे बरेच दिवस हिंदुस्थानांत तो धर्म बन्याच जोराने चालू होता, यांत कांहीं संशय नाहीं. १ बौद्ध धमर्मावर हल्ले सुरू होते. याबद्दल एन्शंट जागृफींतील लेखावरूनहि लक्षांत येण्यासारखे आहे. - • We hear nothing more of Sravasti_until one century after Kaushik or five centuries after Budha, when according to Hiuen Tsiang, Vikramaditya, king of Sravasti, became persecutor of Budhists and the famous Manorhita, the author of the Vibhasha Shastra being worsted in argu- ments by the Brahmins put himself to death. During the reign of his successor, whose name is not given, the Brahmins were overcome by Vasubandhu, the eminent disciple of Manorhita. > Ancient Geography of India by A. Cunningham. हुएनस्यांग याच्या प्रवासवृत्तांतहि या संबंधाने असाच साधारण उल्लेख आहे..