पान:बाणभट्ट.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४० ) , करीत असल्याचे आढळतें. घोड्यांस लगाम व खोगीर असत. नक्षत्रमाला होत्या. राजाजवळ सेवेकरितां वारविलासिनी ( वेश्या ) असत. राजेलोकांत गोरोचनाचा तिलक व त्याचीच अंगास उटी लावण्याची चाल होती; व वस्त्राच्या दोन्ही बाजूंस कांठाला गोरोचनेचे वेल, पक्षी वगैरे काढीत अस ल्याचे आढळते. यावरून त्या वेळीं रेशमादिकांचे कांठ वस्त्रास घालण्याची सुधारणा झाली नव्हती असे दिसतें | अंगास तेल व आंवळकठी लावण्याची चाल होती. तांबूलसेवनाचा व तांबूल देण्याचाहि फार शिष्टाचार होता. व्यास- पीठावर पुस्तक ठेवून त्या कालापासून आतांपर्यंत पुराण सांगण्याची चाल होती तशीच आहे. सांगवेदाचें अध्ययनहि पुष्कळ होतें. शेणानें सारवण्याची चाल होती. मंतरलेले दोरे, लोखंडाचें कडें हातांत घालणे, वगैरे तांत्रिक प्रकार होते. पायांत खडावा घालण्याची चाल होती. प्रसाद व भेट ह्मणून श्रीफळ ( नारळ ? ) देण्याची रीत होती. भूत, प्रेत, वेताळ, शकुन यांवर विश्वास होता. गुग्गुलधूप लावण्याची चाल असे. सूर्योपासना, अर्ध्यप्रदान, आदित्य- हृदयाचा पाठ, वगैरे होते. मुलांच्या व मात्रिकांच्या डोक्यांत बाधा होऊं नये ह्मणून पांढऱ्या मोहन्या ठेवण्याची चाल होती. मुलांच्या गळ्यांत सुवर्ण घटित वाघनखें घालण्याची रीत होती. लग्नाचे वेळीं उखळ, मुसळ, जाते यांस रंग लावून अलंकृत करण्याची चाल होतीं. हळदीचीं वगैरे पांच बोटे जमिनीवर रांगोळीसारखीं उमटविण्याचा प्रघात होता. विवा. हांत इंद्रायणीदेवतेचें पूजन होतें. • बहुलें होतें. शिडीवर चढून कुंचलीनें चुना देण्याचा प्रघात होता. ज्योतिषी यांनी लग्नघटिका ठेवण्याची चाल होती. लग्नांत सोनार बाहेरच्या देवडीवर अलंकार घडवीत बसत असल्याचे आढळून येतं. चित्रे काढणे मातीचीं चित्रे करून मांडणं, आम्रा- दिकांचे पल्लव टांगणें, सुवासिनी स्त्रियांनी वधूवरांची नांवें घेऊन गाणीं ह्मणणें गळ्यांतील ग्रंथियुक्त सूत्र रंगविणें, कलश रंगविणें, वैवाहिक कंकण रंगविणें, मुंडावळ घालणे वगैरे, व छत, झालर, मंगल वाद्ये ही सर्व त्या वेळीं होतीं. लग्नांत विडे वांटर्णे व सुवासिक द्रव्ये देण्याचा परिपाठ होता. आनंदोत्स- वांत अश्लील रास ह्मणत असत. राजस्त्रिया आनंदभरांत नाचत असत. सुवासिनी सिंदुराची टिकली (सिंदूर-कुंकुम ! ) कपाळी लावीत असत. रेशमी वस्त्रे, श्वासोच्छ्वासानें उडण्या इतकी तलम होती. रंगविलेल्या वस्त्राने वधूनें आपणास झाकून घेण्याची चाल होती. अष्टांग आयुर्वेदाचें अध्ययन