पान:बाणभट्ट.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३१ ) निर्वृत्तं सुखस्य | मध्यमे वयसि वर्तमानं दिवाकरमित्रमद्राक्षीत् । अति प्रशान्त गम्भीराकारारोपितबहुमानश्च सादरं दूरादेव शिरसा मनसा वचसा च ववन्दे " | यांत त्या वेळी प्रचारांत असलेली अनेक शास्त्रे व पंथ कवीनें दाख विले आहेत. दिवाकरमित्राच्या सौजन्याविषयी हर्षाच्या मुखांतून फारच कळवळ्याचे उद्गार निघालेले आहेत ! "राजात्वचिन्तयत् 'अलोहः खलु संयमनपाश: सौजन्यमभिजा- तानाम् । स्थाने खलु तत्र भवान् गुणनुरागी ग्रहवर्मा बहुशो वर्णित- वानस्य गुणान् ' इति । ” राज्यश्रीच्या अनुकंपनीय स्थितीनें सत्पुरुष दिवाकरमित्रास गहिवर. हर्ष व त्याची बहीण राज्यश्री यांची भेट होऊन कांहीं वेळाने उभयतांचा शोक कमी झाल्यावर हर्षाने आपल्या बहिणीस दिवाकर मित्रास वंदन कर ण्यास सांगितलें, त्या वेळी तिची स्थिति पाहून शमादिसंपन्न, विचारी व विद्वान् असा दिवाकरमित्र असतां त्यालाहि शोक आवरला नाहीं. मग इतर अज्ञाजनास तो आवरत नाही याचे काय नवल आहे ! “ततो नरेन्द्रो मन्दमन्दमब्रवीत्वसारम् - 'वत्से वन्दस्वात्रभवन्तं भदन्तं एप ते भर्तुर्हदयं द्वितीयमस्माकं च गुरुरिति । राजवचनात्तु राजदुहितरि पतिपरिचयश्रवणोद्भतेन पुनरानीतनेवाम्भसि नमन्त्या- माचार्यः प्रयत्नरक्षितागतवाप्पाम्भः संभारभज्यमान धैर्याईलोचनः किंचित्परावृत्तनयनो दीर्घ निशश्वास | स्थित्वा च क्षणमेकं प्रदर्शि- तप्रश्रयो मृदुवादी मधुरया वाचा व्याजहार-'कल्याणराशेऽलं रुदित्वातिचिरम् | राजलोको नाद्यापि रोदनान्निवर्तते । क्रियताम वश्यकरणीयः स्नानविधिः स्नात्वा च गम्यतां तामेव भूयो भुवम् ' ।" पतिमरणामुळे स्त्रीचे निराशेचे उद्गार. पतिमरणानें तर कुलीन व दीन विधवांच्या तोंडावाटे कसे निराशेचे उद्गार निघतात, है बाणभट्टाने पुढील लेखांत थोडक्यांतच पण मार्मिकपणानें दाखविले आहे. 66 " लब्धविश्रम्भा राजश्रीस्ताम्बूलवाहिनीं पत्रलतामाहूयोपांशु- किमपि कर्णमूले शनैरादिदेश | दर्शितविनया च पत्रलता पार्थिवं