पान:बाणभट्ट.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५३ ) म्हणाला महाराज आपण धन्य आहां ! आपले प्रधान शुकनास यांनांहि पुत्र झाला !” तें ऐकून सर्वांस आनंदाचें भरतें आलें. मग राजा शुकनासा- बरोबर त्याचे घरी गेला व तेथें त्यानें मोठा आनंदोत्सव करविला. राजाने मोठ्या थाटानें षष्ठीजागर केला व दहावे दिवशीं मोठा दानधर्म केला. त्यानें आपल्या पुत्राचें चंद्रापीड असे नांव ठेविलें व शुकनासाने आपल्या पुत्राचें वैशंपायन असे ठेवलें. ते मुलगे थोडे मोठे झाल्यावर तारापीडानें आपल्या पुत्राचे लक्ष विद्ये कडे लागावें म्हणून नगराबाहेर शिमानदीचे कांठीं विद्यालय बांधविलें व त्या ठिकाणी विद्वान् गुरूंची योजना करून चंद्रापीड व वैशंपायन यांस तेथें नेऊन ठेविलें. तेथें गुरुपुलांखेरीज फारसे दुसरे लोक नव्हते. पुढे चंद्रापीड हा अल्पकाळांतच विद्या व कला यांत प्रवीण झाला, त्यामुळे त्याच्या गुरूंस फार धन्यता वाटली. वैशंपायनहि तसाच विद्या व कला यांत झाला व आपल्या सद्गुणांमुळे तो चंद्रापीडाचें विश्वासस्थान झाला. निष्णात 66 चंद्रापीडाचा विद्याभ्यास पुरा होऊन तो तारुण्यांत आला, असे पाहून गुरूंनी त्यास घरी जाण्यास सांगितले. राजानें चांगला दिवस पाहून बला. हक सेनापतीस चंद्रापीडास घरीं घेऊन येण्यास सांगितलें. तो राजपुत्र व सैन्य यांसह विद्यामंदिरांत गेला व त्याने चंद्रापीडास राजाची आज्ञा कळविली. मग बसण्याकरितां आणलेल्या इंद्रायुधअश्वाची समुद्रापासून उत्पत्ति सांगून " हा अश्व पारसीकदेशच्या राजाने महाराजास नजर केला " असे सांगितलें. चंद्रापीडाने त्या अश्वास आंत आणण्यास सांगितलें. त्यास पाहून चंद्रापीडास फारच आश्चर्य वाटून सर्व पृथ्वीत माझ्या पित्याचें ऐश्चर्य सर्वीपेक्षा मोठें असे त्यास वाटलें. तो म्हणाला, " समुद्राने हा अश्व न दाखवितां भलताच अश्व दाखवून खरोखरच इंद्रास फसविलें ! याची आकृति व तेज फारच अलौकिक असल्यामुळे हा कोणी देवांश असावा असे वाटतें! " मग आपल्या गुरूंस नमन करून व विचारून तो अश्वावर बसला. त्यावेळी त्यास सर्व त्रैलोक्य अगदी अल्पसे वाटून तो बाहेर आला व तेथे आलेल्या सर्व राजपुत्रांचे व सैनिकांचे मुजरे घेऊन त्यानें त्यांस आनंदित केले. नंतर तो तेथून निघून नगरांत गेला. तेथें चंद्रापीडास पाहण्याकरितां मोठी गर्दी जमली होती. वैशंपायनहि घोड्यावर बसून त्याजबरोबर चलला होता. त्यास पाहून आपण मोठे पुण्यवान् व धन्य आहों असें लोकांस वाटलें, चंद्रापीडरूपानें