पान:बाणभट्ट.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४१ ) असे ला. मग ते चालले असतां 'आमच्या स्वामिनीचें कोणी रक्षण कराहो !" याप्रमाणें स्त्रीजनाचे अनेक प्रकारचे प्रलाप त्यांच्या कानीं पडले व पुढे घाईनें जाऊन पाहूं लागले, तो सर्व स्त्रिया जीव देण्यास तयार झालेल्या आहेत, त्यांच्या दृष्टीस पडलें. ते पाहून सर्वजण फारच घाबरले. पुढे हर्षानें अग्नि- प्रवेशास उद्युक्त झालेल्या आपल्या बहिणीस ओळखिलें व धावत जाऊन तिला आवरून धरिलें ! अशा वेळी एकाएकी प्रियबंधूच्या स्पर्शानें अमृताने सिंचन केल्याप्रमाणें राज्यश्रीस वाटले. तिनें लागलींच आपल्या भावास ओळखून त्याच्या गळ्यास मिठी मारिली ! मग त्या दोघांनी फार वेळ शोक केला. त्या वेळी झालेल्या भाषणावरून दिवाकर मित्रास हा हर्षराजा आहे अर्से समजलें. मग त्याने आपल्या शिष्यांकडून उदक आणून हर्षास तोंड धुण्यास दिलें. हर्षाने पहिल्याने आपल्या बहिणीचें तोंड धुऊन मग आपले धुतलें. नंतर हर्ष आपल्या बहिणीस ह्मणाला, " हे साधु तुझ्या पतीचे बालमित्र व माझे गुरु आहेत " अशा रीतीनें पतीचें स्मरण होतांच राज्यश्री- स हुंदका येऊन रडूं कोसळलें. दिवाकरमित्र व हर्ष यांचीहि तशीच अवस्था झाली. नंतर दिवाकरमित्र हर्षास ह्यणाला, " आतां कोठवर शोक करितां? तो कितीहि केला तरी थोडाच संपणार आहे. ? तुझां दोघांस फारच दुःख व श्रम झाले आहेत, यासाठी अगोदर स्नान करून फला- हार करा." मग दिवाकरमित्राच्या आग्रहावरून हर्षाने आपल्या भगिनीस स्नान घातलें व आपणहि केलें. नंतर तिजकडून मोठ्या प्रयासानें उपहार करवून आपणहि केला. पुढे आपल्या बहिणीचे हृदयद्रावक सर्व वर्तमान हर्षाने ऐकलें. तें ऐकतांच हर्षास अतिशय दुःख झाले. मग दिवाकर मित्राने त्यांजवळ बसून अनेक बोधपर वचनांनी त्यांचें समाधान केले. तो दिवस गेल्यावर दिवाकरामत्र हर्षाजवळ बसून ह्मणाला. " मला एक गोष्ट सांगावयाची आहे. कोणे एके वेळी चंद्र उदयास आल्यावर् त्यानें आपले प्रतिबिंब समुद्रोदकांत पाहिलें. ते पाहतांच त्यास आपल्या प्रियेच्या मुखचंद्राचे स्मरण होऊन विरहोत्कंठेमुळे त्याचे नेत्रांतून अश्रुबिन्दु गळाले ! ते समुद्रांतील शिपांच्या उदरांत शिरून त्यांची त्यांत सुंदर मौक्तिकें बनलीं ! तीं मौक्तिकें पुढे पाताळी वासुकीस मिळाली. त्यानें त्यांची एक पदरी कंठी करून तीस ' मंदाकिनी' असे नांव ठेविलें ! ती औषधी- नाथ चन्द्र याजपासून झाल्यामुळे विषादिदाहाचे शमन करणारी असल्या- राजा,