पान:बाणभट्ट.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९५ ). स नेव नगरे न केनचिदपाचि न केनचिदस्त्रायि नाभोजि सर्वत्र सर्वेणारोदि । केवलमनेन क्रमेणातिचक्राम दिवसः । च प्रत्यग्रत्वष्ट्रटकतष्टतनुरिव वहद्बहलरुधिररस- मांसच्छविरपरपारावारपयास ममज्ज मजिष्ठारुणोऽरुण- सारथिः । मुकुलायमानकमलिनीकोपविकलं चकाण चञ्चरीककुलं कमलसरसि । सविधविरहव्याधिविधुर- वध्वाध्यमानं बबन्ध बंधाविव विबुद्धबन्धुभासि भास्व ति सास्रां दृशं चक्रवाकचक्रवालम् | संचरन्त्याः समधु कररवं कैर वाकरं कलहंसरमणीरमणीयं माणिक्यकाञ्ची- किङ्किणीजालमिवाचकाण श्रियः । मकटकलंकमुदीय- मानमकाशताकाशे शशाङ्कमण्डलम् । " यांत प्रतापवर्धन वारल्यावर राज्यवर्धन हा मोहिमेवरून आला तेव्हां तो हर्ष आणि इतर आप्तमित्र व प्रजा अत्यंत दुःखित झाल्याचा प्रसंग कवीनें वर्णन केला आहे व त्याला लागूनच सूर्यास्ताचें वर्णन केलेले आहे. सूर्य अस्तास गेल्यामुळे भ्रमर व चक्रवाकपक्षी करुणस्वराने ओरडूं लागले आणि शशांकमंडल प्रकाशित झालें ! असें वर्णन केले आहे यावरून सूर्या - स्ताच्या जागीं प्रतापवर्धनाचा अस्त, आणि भ्रमर व चक्रवाक यांच्या अरवण्याच्या जागीं त्यांच्या आप्तादिकांचा आक्रोश, हे कवीनें ध्वनित केले असावे असे लक्षांत येतें. तसेंच शशांक ( चंद्र व गौड ) यांचें मंडल प्रकाशित ( पक्षी आनंदित ) झालें ! असेंहि कवीनें ध्वनित केले आहे. प्रबलशत्रु ( प्रतापवर्धन ) वारल्यामुळे गौड-शशांक यास अत्यंत आनंद होणें हें साहजिकच आहे ! , मार्गे एक ठिकाणीं वाणानें सूर्यवाचकशब्दानें प्रतापवर्धन याचें ग्रहण केल्याबद्दल स्पष्ट उल्लेखहि आहे. तो असा:- F ● “अत्रैव चांतरे भवनकमलिनीपालः कोकमाश्वासयन्नपरवक्त्रमुच्चै रपठत् । १. ध्वन्यर्थाची उत्तम काव्यांत गणना केली असल्याबद्दल विद्वज्जनास सांगावयास नकोच !