Jump to content

पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९७) इतर सिद्धांत जसे विस्तृत आहेत, सर्व विषय त्यांत असतात तसा हा नाही. सांप्रतचा सूर्यसिद्धांत, ब्रह्मगुप्तसिद्धांत, सिद्धांतशिरोमणि, ह्या सिद्धांतांवरून गणित करण्यास करणग्रंथाहून जास्त वेळ लागेल हे खरें, तरी त्यांतला कोणताही एक असला तर दुसरा ग्रंथ नाही ह्मणून अडणार नाही. तसे याचें नाहीं. उदाहरणार्थ, तिथि, नक्षत्र, करण ही काढण्याची रीति यांत नाही. महापाताचे गणित कांहींच नाही. महापात आर्यभटास माहीत नव्हता असें नाहीं, त्याचा उल्लेख आयसिद्धांतांत आहे. तसेंच तिथिनक्षत्रादिक त्याच्या वेळी असलीच पाहिजेत. याप्रमाणेच इतरही काही गोष्टी आ हेत. इतर सिद्धांतांत त्या असतात. यावरून. आर्यभटानें एकादा करणग्रंथ केला असावा असें मनांत येते. दिनप्रवृत्ति सूर्योदयीं हे आर्यभटाचें ह्मणणे दशगीतिकांतील २ री आर्या वर दिली आहे (पृ. १९२) तींत आहे. परंतु लंकार्धरात्रकाली दिनप्रवृत्ति असेंही तो ह्मणतो असें वराहमिहिर ह्मणतो. (पृ. १६८ पहा)तें आर्यभटाचें मणणे आर्यभटीयांत कोठे आढळत नाही. याबद्दल ब्रह्मगुप्तही त्यास दूषण देत नाही. यावरून ब्रह्मगुप्ताच्या वेळीही तशी एखादी आर्या आर्यभटीयांत नव्हती असे सिद्ध होते. 'दशगीतिक' आणि 'आर्याष्टाशत ' ह्या आर्यसिद्धांताच्या दोन भागांचा उल्लेखही याच शब्दांनी ब्रह्मगुप्ताने केला आहे. यावरून ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीपासून जो आर्यभटीयसिद्धांत आहे त्यांत कोणी कमजास्त केलेले नाही असे दिसून येते. यावरून आर्यभटाचा दुसरा एकादा ग्रंथ असावा असें वराहमिहिराच्या या लिहिण्यावरून दिसते. आणि ब्रह्मगुप्ताचे खंडखाय व त्यावरील वरुणाची टीका यावरून आर्यभटाचा एखादा करणग्रंथ असावा असे अनुमान होते. तो सांप्रत उपलब्ध मात्र नाही. ब्रह्मगुप्ताने आर्यभटास फारच दूषणे दिली आहेत. निरनिराळ्या प्रकारची दू पणे सांगून पुढे तो ह्मणतोःस्वयमेव नाम यत्कृतमार्यभटेन स्फुटं स्वगणितस्य ॥ सिद्धं तदस्फुटत्वं ग्रहणादीनां विसंवदति ॥४२॥ जानात्येकमपि यतो नार्यभटो गणितकालगोलानां ।। न मया प्रोक्तानि ततः पृथक् पृथक् दूषणान्येषां ॥ ४३ ॥ आर्यभटदूषणानां संख्यावक्तुं न शक्यते...॥ ब. गु. सि. अ. ११. यांत आर्यभटाच्या ग्रंथावरून ग्रहणादिकांचा विसंवाद ब्रह्मगुप्ताच्या वेळी होत असे (दृक्प्रत्यय बरोबर येत नसे) हे विचार करण्यासारखे आहे. बाकी कांहीं दूषणे वर सांगितली आहेत त्यावरून त्यांचं सत्यासत्यत्व दिसून येईल. एकंदरीत पहातां कांहीं दूषणे खरी आहेत हे खरे, तरी ब्रह्मगुप्ताच्या लिहिण्यांत दुराग्रहाचा भाग फार आहे. कालांतरेण दोषा येन्यैः प्रोक्ता न ते मयाभिहिताः ।। असें ब्रह्मगुप्त ह्मणतो. परंतु ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीच्या उपलब्ध ग्रंथांपैकी पंचासग्रंथलोप. द्धांतिकेंत आर्यभटाचे नांव मात्र आढळतें. दूषणे कोठेच आढळत नाहीत. यावरून ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीचे काही ग्रंथ लोपले असावे. शक ४२० च्या पूर्वीचे ग्रंथकार वर सांगितले त्यांचे ग्रंथ हल्ली नाहीत. दोष.