Jump to content

पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वमीमांसा. १२१ व आठवणी ज्याला कळताहेत असा सर्वज्ञ मनुष्य असल्यावांचून त्याला असे विधान करता येणार नाही, मनुष्यमात्रांत सर्वज्ञ तर कोणीच नाही. यावरून मीमांसाकारोंच मत स्थापित होत नाही. (३) वेदाचें पौरुषेयत्व अनुमानाने सिद्ध होते. ते असेंः-वेद हे पौरुषेय आहेत ( प्रतिज्ञा ), कारण ते वाक्यात्मक आहेत. जेथे जेथे वाक्यत्व असते तेथे तेथे त्या वाक्यांचा कर्ताहि असावयाचाच. म्हणजे ती वाक्ये पौरुषेय असतात. ( हेतु) कालिदासादि कवींचे ग्रन्थ, हे याचे उदाहरण. वेद हे वाक्ये आहेत. ( उपनय ). म्हणून वेद हे पौरुषेय आहेत, हा सिद्धान्त ( निगमन ) .अशाच रीतीने वेद हे प्रमाणभूत ग्रंथ आहेत असे सिद्ध करता येईल. उदाहरणार्थ मन्वादि. कांच्या स्मृती होत. ( ४ ) एकाद्या मुलाने वेदाध्ययन करण्यास आरंभ केला म्हणजे तो गुरूजवळ असतो. ह्या त्याच्या अध्ययनास आरंभ होण्याच्या अगोदर त्याच्या गुरूचे वेदाध्ययन झाले असले पाहिजे, याप्रमाणे वेदाचे अध्ययनाची परंपरा अनादि कालापासून चालू असल्यामुळे आजमित्तीस जसें अध्ययन होत आहे तसेंच अनादिकालापासून तें होत आले आहे, म्हणून वेद अपौरुषेय आहेत, असे जर मीमांसाकार म्हणतील तर त्यास आमचे (नैयायिकांचे ) असें उत्तर आहे की हा कोटिक्रम योग्य नाही. कारण भारताच्या अध्ययनाचीहि अशीच अबाधित परंपरा आहे, असें आप. ल्यास सिद्ध करता येईल. यावर मीमांसाकार असें म्हणतील