Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ प्रसन्नराघवनाटक - श्लोक -202 रामाची हि पुढे सरे कपिचमू 'रात्रिचरांच्या दळी जी पाडी अवघे निशाचर बळी मारूनि या भूतळी ।। सूर्याची उदयप्रभा तम जशी निःशेष नाशीतसे झाले त्यापरि एकही न समरी सप्राण कोणी दिसे ॥२१॥ 10- (त्रासून ह्मणतो. ) अरे वानरांचा उत्कर्ष झाला काया ( मग मोठ्याने गर्जना करून ह्मणतो.) अरे, एथें कोण आहेरे १ जा, मी सांगतो तसे कर. आर्या जो कुंभकर्ण निद्रित त्यातें जागृत करून सांगावें ॥ की रामसमर तूं कर इंद्रजिते लक्ष्मणासह लढावें ॥२२।। (पडद्यांत ) महाराजांची आज्ञा होण्याच्या पूर्वीच मा. ल्यवान प्रधानाने महाराजांचा मनांतला अभिप्राय जा. णून ही तजवीज केली आहे आतां तर, श्लोक हा कुंभकर्ण लढतो रघुनायकाशी ज्याचा प्रताप जगतांत असे विकाशी ।। जो मेघनादहि तसा तव पुत्र शूर तो लक्ष्मणासह लढे समरांत धीर ।। २३ ।। (पडद्यांत) आर्या निजदंष्टावजाने समरी वानरगिरीस जो फोडी ॥ युद्धी वानरवणवा विझवाया शरजलास जो सोडी ॥ २४ ॥ हा वीर कुंभकर्ण प्रसिद्ध तो मेघनाद दोघांची । १ राक्षस २ तुझा