Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





प्रमाणशास्त्र




(म्हणजे पुराव्याचा कायद्याची तत्त्वे.)
परिभाषा.

 १. कोणत्याही म्हणण्याचा खरेपणा किंवा खोटेपणा उघड किंवा साफ जेणेकरून होतो, त्यास त्या

म्हणण्याचे प्रमाण, म्हणजे पुरावा, असे म्हणतात.

 २. ज्या वेळी ते प्रमाण इतकें मजबूद असेल, की तेणेकरून मनांत खचितपणा किंवा निश्चय उत्पन्न व्हावा, तेव्हां त्यास शाबिती असे म्हणतात; आणि

ती घडलेली गोष्ट शाबीत झाली असे म्हणतात.

 ३. ज्या घडलेल्या गोष्टीचा किंवा परराज्यसंबंधी कायद्याचा बाबतींविषयी तंटा असेल त्यांचा खरेपणा शाबीत करण्यास्तव, किंवा त्यांचे प्रत्यंतर पाहण्यास्तव, इनसाफाची कोट जो पुरावा घेतात, त्यास

(जुडिशियल एव्हिडेन्स, झणजे ) न्यायसंबंधी प्रमाणे म्हणतात.

 ४. सदर कोटीतून, आणि हिंदुस्थानांतील मलकांमधील [ इतर ] न्यायाचा ठिकाणी इंग्लिश् प्रमागशास्त्राप्रमाणे बहुधा काम चालते; परंतु त्यांत कां. ही भेद केले आहेत, ते पुढे सांगण्यात येतील.