पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ गा। पानसे घराण्याचा इतिहास. बतचे ठरवून आपल्याकडून इनाम करार केला. या गोष्टीवरून शिवाजमिहाराजांची न्यायनिष्ठुरता जशी प्रत्ययास येते तशीच गोविंद विश्वनाथ पानसे यांची दयाद्बुद्धि हि समजते. ज्या जानोजीने त्यांच्या विरुद्ध साक्ष देऊन त्यांना दिव्य करण्याच्या उपद्व्यापांत पाडले, त्या च जानोजीची सरकारी शिक्षा रद्द करण्याबद्दल गोविंदपंतांनी आपल्या पदरास खार लावून घेऊन रदबदली केली. अर्थात् अशा प्रकारचे सत्त्वस्थ, व शत्रीमत्रांस सारख्या दृष्टीनें लेखणारे गोविंदपत दिव्यांत उतरले म्हणजे खरे ठरले यांत कांहीं नवल नाहीं. १०. सोनोरीच्या वृत्तींचे वाटप . या प्रमाणे गोविंदपंतांनी बाहेरचा वाद जिंकला खरा, पण, आतां घरांतील वाद शिल्लक राहिला. मागे सांगितले च आहे की, गोविंदपंतांनीं सोनोरीच्या कुळकरणावर आपला गोत्रज भाऊ रखमाजी बापूजी पानसे यांस नेमिले होते. हा रखमाजी पानसे बाबाजी लक्ष्मधिर याचा नातू होय. हा पानशांच्या सोनोरीच्या ज्योतिषकुळकरणाच्या वृत्तीतील एक निम्मा तक्षीमदार होता. | लक्ष्मीधर यांना तनि पुत्र परशुराम, विठोबा व बाबाजी. परशुरामाचा नातू गोविंद विश्वनाथ यांनीच वरील दिव्य केलें, विठोबास नारोवा या नांवाचा एक मुलगा होता. पुढे नारोवास पुत्र न झाल्यामुळे निर्वश झाला. म्हणून सर्व वृत्तीची मालकी परशुराम व बाबाजी या दोघां भावांकडे आली. रखमाजी हा बाबाजीचा नातू असल्याने तो निम्म्या वृत्तचिा मालक न्यायानेच होता; ज्या वेळीं रामाजी गांवखंडेराव व गोविंद विश्वनाथ यांच्यात वाद चालू होता, त्यावेळी गोविंदपंतांनीं रखमाजी बापूजी यास विचारले की, “सोनोरीच्या ज्योतिष व कुळकरण या दोन वृत्तांत आमच्या प्रमाणे तुमची हि एक तक्षम ( वांटणी ) आहे. सध्या रामाजी हा आमच्या विरुद्ध उठला असून त्याने सरकारांत या वृत्तीबद्दल वाद चालविला आहे. वादांचे निराकरण करण्यास आम्ही जातों च आहों. पण, तुम्ही हि आम्हांला या कामी सामील होऊन मदत करावी. कारण आमच्या प्रमाणे तुमची हि निम्मी.वृत्ति या वादामुळे अडचणीत येण्याचा संभव आहे. तरी यासाठी वाद चालविण्याचे एक समा ( इकी) पत्न करून द्या. रखमाजीस, बाबाजी, शिवाजी आणि गोमाजी या नांवांचे तीन भाऊ होते. गोविंदपंतांनी केलेली ही सूचना या चार भावांना पसंत पडली नाही. ते म्हणाले की, समापत्रांत नांव घातले म्हणजे वादासाठी जो खर्च येईल त्यापैकी निम्मी रक्कम आपणास द्यावी लागेल. पण, तेवढी रक्कम देण्यास आम्हांस सामर्थ्य नाही. म्हणून आम्ही या भानगडीत पडत नाही. गोविंदपंतांनी स्वतःच्या खर्चाने वाद चालवावा, वादांत यश आल्यास आम्ही आपली निम्मी तक्षीम त्यांना देऊन टाकू. याप्रमाणे रखमाजी आदिकरून चार भावांनी सांगितल्यावर गोविंदपंतांनी एकट्यांनी ( आपले सख्खे भाऊ, त्र्यंबक, मोरोपंत, माणकोपंत व उद्धवराव