Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणिपतची बखर २७ २०. दुतर्फा नाश बहत झाला ।। येणेप्रमाणे नामी नामी सरदार दहा पांच हजारांचे व हजार दोन हजारांचे व चारशें पांचशांचे अमित्राकडील ठार पडले व मनसूरअली व सुजातदौला व अबदल्ली व हस्तनापूरवासी यांजकडील लोक पडले, त्यांची गणना लागली नाही. अजमासे पठाण वगैरे तीस हजार ठार झाले. दिल्लीपद बादशाहाचे वकिलांनी टीप लिहून सदाशिवपंत भाऊंस दाखविली व सदाशिवपंतांकडील वकिलांनीं याद पडल्या लोकांची नांवनिशीवार इराणी व दुराणी व मुख्य बादशाहा दिल्लीपती यांस दाखविली. याप्रमाणे दुतर्फ नाश बहुत झाला. २१. ‘मराठे बड़े जोरदार हटेले'। इराणी अंतर्यामी हिय्या न सोडितां सुजातदौला व मनसुरअली यांस बोलला कीं, " बम्हनने बडा गजब किया ! मराठे बड़े जोरदार हटेले ! अटपले जातात असे दिसत नाहीं. सलूख करावा ये अच्छा. इस बातमें खुबी है." असे बहूत प्रकारें सांगितले. त्याजवरून त्या उभयतांनीं सलूखाचे सदाशिवपंत भाऊंकडे सूत्र लाविले. परंतु सदाशिवपंत भाऊंच्या चित्तांत सर्वथा सलूख करावयाचा नाही. त्यांची हत्यारे हिसकावून घेऊन देशोधडी लावावे हाच निश्चय. दुसरा अर्थ नाहीं. २२. जखमी लोकांची उस्तवारी । पहिले लढाईत, दुसरे लढाईत व तिसरे लढाईंत जे जे सरदार नामी नामी व धारकरी व एकांडे हुजरातीचे लोक व शांगिर्दपेशा व राजमंडळींचे मानकरी पडले त्यांस तर मुठमाती दिली; व घायाळ जखमी होते त्यांस औषधपाणी तबीबापासून ४ करवावे त्या उस्तवारीस भाऊसाहेब एक महिना लागले. तसेच दिल्लीपद बादशाहा व इराणी दुराणी व हस्तनापूरवासी इत्यादिक उस्तवारीस लागले. सदाशिवपंत भाऊ व विश्वासराव साहेब या उभयतांनीं जखमी लोकांच्या दिवसांतून एक वेळ राहुटीस स्वतः पायउतारा (१) अजमासे. हे वाक्य नागपूर प्रत व पुणे प्रत २ मध्येच आहे. (२) टोप-नोंद, यादी. (३) शागिर्द-परिचारक, नोकरचाकर, (४)तबीबशस्त्रवैद्यः (५) उस्तवारी-व्यवस्था." { २८ /