Jump to content

पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १६४] येशूचे पहिले दर्शन. ३२३ सूचना, खीस्तामध्ये देवाची परिपूर्ण शक्ति होती, तिच्या योगाने तो मरणाकडून मरणावर जय पावला. त्याच्या पवित्र शरिराला कुज- ण्याचा अनुभव झाला नाही. आणि आपल्या पवित्र व परिपूर्ण झालेल्या मनष्यत्वासाठी त्याने आपले शरीर नवीन व तेजस्वी व सुखसंपन्न वस्तीत राहण्याकरितां केले.-रोम०६,९. “आह्मास ठाऊक आहे की, खीस्त मेलेल्यांतून उठविला असतां पुढे मरत नाहीं; त्याजवर मरणपढे सत्ता करीत नाही." जसे शरिराला खिळ्यांच्या खुणा व भाल्या- चा घाय होता (प्रक० १६७क० २) तसेच त्याचे शरीर फिरून उठले. तथापि पूर्वी जी अशक्तता होती, ती आतां नाहींसी झाली. मरणारे जे ते अमरपण पावले आणि त्याची "पापी देहाची प्रतिमा" हीनाहींसी झाली.-खीस्त मेलेल्यांतून पुन्हा उठला तेणेकरून त्याने आपले उद्धाराचे काम शेवटास नेले. जेणेकरून जगाच्या पापाचा दंड फिटतो, असे अत्यंत योग्य आणि अनंतकाळ टिकणारे पुण्य त्याने दःख सोसण्याकडून व मरण पावण्याकडून मिळविले आणि आपल्या पन्हा उठण्याने नवे जीवनही त्याने सिद्ध करून ठेवले आहे. जे कोणी विश्वासेकरून त्याचे संबंधी होतात, त्या सासत्यापासून जीवन प्राप्त होते आणि ते त्यांस दृढ करून त्यांनी पापाच्या विरुद्ध उभे राहवें ह्मणून शक्ति देते, आणि ती शक्ति त्यांचे सर्व पाप नाहीसे होईपर्यंत त्यांमध्ये वृद्धि पावती. २ तीम० १, १० "त्याने मरणाला नाहीसे करून जीवन व अक्षयता प्रकाशित केले आहे." रोम० ५,१० “आह्मी वैरी असतां देवासी त्याच्या पुत्राच्या मरणाकडून आमचा समेट झाला. तर समेट झाल्यावर त्याच्या जीवनाकडून विशेषेकरून आमी तरूं." प्रक० १६४. येशूचे पहिले दर्शन. ( मात्थी २८. मार्क १६. लूका २४. योह० २०.) १.आणि मारया माग्दालीणी फिरून थड्याजवळ जाऊन बाहेर रडत उभी अहिली आणि रडता रडतां तिने थड्यांत डोकावले. आणि जेथे येशूचे शरीर ले होते तेथे पांढरी वस्त्रे ल्यालेले दोन दूत एक उशाजवळ व एक सयाजवळ बसलेले असे तिने पाहिले. त्यांनी तिला झटले: "बाई. कां रडतीस?" ती त्यांस ह्मणाली: “ त्यांनी माझ्या प्रभूला नेले, आणि त्याला