Jump to content

पान:पथनाट्य.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असतात या नदीसारखे. वरून शांत पण आतून घडामोडी घडत असतात. खोलवर. प्रेयसी : निसर्ग धर्म आहे तो सरळ, सोप साथ वाटणार तस कधीच नसत प्रेमाचही तसच आहे प्रेम हे करून टाकायची गोष्ट नसते. ते खूप विचारपूर्वक जबाबदारीने स्वीकारायची गोष्ट आहे. गाड्या घेऊन मुलींना मग घेवून चकरा मारणे, घरापर्यंत मागे मागे जाणे, कुणाचेतरी आलेले नेसेज व्हॉटस्अॅपवर फॉरवर्ड करणे, फॉरवर्ड केलेले लगेच डिलीट करणे हे सगळ नाही आवडत अलीकडेच्या मुलींना. त्यांना मुलांचा स्वभाव, वर्तणूक, घरचे वातावरण, मित्रमंडळी कसे आहेत. तो व्यसनी आहे का ? हे सगळ मैत्री दृढे करण्यासाठी महत्वाचे ठरतात. (घड्याळ बघते.) बापरे मला निघायचय. शेवटची एस.टी.तरी मिळू दे. प्रियकर :ए बस ना थोडावेळ किती छान बोलतेस ना तू? प्रेयसी : काय आहे ना प्रत्येक प्रेमात पडलेला सुरुवातीला हिच वाक्य बोलतो. किती छान दिसतेस. किती गोड बोलतेस. ऐकत राहाव असं वाटतं. प्रियकर : अरे काय प्रॉब्लेन आहे तुला? प्रेयसी एक कान कर हा दगड घे आणि आणि पाण्यावरती असा मार की ती चार ते पाच वेळा पाण्यावरून उडत गेला पाहिजे. ओके. हा घे. बाय बाय. प्रियकर : अग थांब आलो. (स्टेजच्या आत गेल्यानंतर) मला कळव फोन वर काय होतय ते... (सिन बदलतो मुलीच्या घरी मुलगी आलीये वडील आणि मुलगी बसलेत.) वडिल उशीर झाला तुला यायला, अंधार पडायला लागला. मुलगी हो गाडी मिळायला पुण्यावरून उशीर झाला म्हणून. वडिल तुला सांगितल्या आपल्यात पोरीच्या जातीनं रात्रीच्या आत घरात याव. मुलगी हो