Jump to content

पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नितीज्ञानप्रभा. لم ئه ६ गर्व. १ गर्व ह्या शद्वाचा अर्थ. आपल्या स्वतःविषयींच आपणास ज्ञान नसणे. गर्व ह्मणजे ज्ञानाचा तिरस्कार करण्याची इच्छा. ३ गर्व हे चुकीचें बीज होय. ४ गर्वाची पहिली निशाणी;दुसऱ्यास हलके समजणे. गर्वाची दुसरी निशाणी,एकाद्याला ज्या गोष्टीत आपले नुकसान आहे असे कळते, त्यांतही तो आपला हेका सोडीत नाही. गर्वाने परमेश्वराचा मुद्धा तिरस्कार होतो. तेव्हां गर्विष्टमनु प्यापेक्षां ह्या पृथ्वीवर अक्कलशून्य प्राणी कोणता ? ७ गर्वामुळे ज्ञान नाहीसे होऊन आपण तिरस्कारास पात्र होतो. गर्विष्टमनुष्याची त्याच्याहून थोरपदवीचे लोक बेपरवाई करितात, त्याच्या बरोबरीचे लोक त्याचा तिरस्कार करि तात आणि त्याच्याहून हलके लोक त्याचा द्वेष करितात. ९ गर्वाने विद्या प्राप्त होत नाही. १० गर्वाने आपले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. ११ गर्व होणे ह्मणजे विनाशकाळची वेळ आली असे समजावें. १२ गर्विष्ट मनुष्य ठोकरा खातो, पश्चात्ताप करितो, तरी हा कशा चा परिणाम आहे, हे एकतर तो समजू शकत नाही आणि समजलाच तर, ह्याला काय उपाय करावा, हे त्याच्या लक्षात येत नाही, आणि त्यास उपाय कोणी सांगितलाच तर