पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्रांतीचा विचार या लोकांना माहीत नाही. ढोबळमानानं, जेपी नावाचा एक भला माणूस देशाचं सगळ्या अंगांनी भलं करायला निघाला आहे, असं ही माणसं एकतर्फीपणानं मानत असत. जेपींच्या विचारांचे धागे गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद, मिश्र अर्थव्यवस्था, ग्रामप्रधान व्यवस्था, विकेंद्रीकरण इत्यादी अनेक विचारांमध्ये गुंतलेले होते. मी असे विषय काढले की लोक त्यावर प्रतिक्रिया द्यायला टाळत. कारण त्या गोष्टी त्यांच्या परिचयाच्या नसत, त्यांना त्या किचाट वाटत. कित्येक वेळा चर्चा निघाली की लोक म्हणत, असले वाद वगैरे आम्हांला सांगू नका, चांगला माणूस पाहिजे, चांगला नेता पाहिजे, बस झालं, कलकत्त्यातली माणसं म्हणत की नेताजी हवे होते, महाराष्ट्रातली माणसं म्हणत की टिळक, शिवाजी वगैरेंसारखा एक माणूस असला तरी पुरे, म्हणजे एखादा अवतारपुरुष झाला की भानगड संपली. मग आम्हांला काही करायला नको, सारं तो पाहून घेईल. आम्ही घोरत पडावं. मी म्हणे, अहो, असं एका माणसानं होत नाही, संपूर्ण समाजाची तयारी लागते. आपण काही केलं तरच अशा एखाद्या माणसाचा उपयोग होतो, जेपींच्या सोबत काम करणाऱ्यांमध्ये बरीच माणसं सर्वोदयी - गांधीवादी होती. त्यांना काही प्रमाणावर खादी ग्रामोद्योगाच्या संस्था चालवण्याचा अनुभव होता. पण सभोवतालचं जग व बदललेलं वातावरण या संदर्भात हा अनुभव उपयोगी नव्हता. ही सर्वोदयी मंडळी वगळली तर बाकीच्या बहुतेकांना संस्था चालवणं, काम करणं याचा अनुभव नव्हता किंवा कमीच होता. त्यामुळं त्यांचं जेपींवरचं प्रेम किंवा चळवळीतला सहभाग हा वैचारिक पातळीवरचा (इंटलेक्च्युअल पातळीवरचा) असे. कार्यक्रम अमलात आणणं, संस्था चालवणं, व्यवहार करणं याचा त्यांचा अनुभव मर्यादित होता. जेपी या माणसामध्ये स्वतंत्रपणे काही गमती होत्या, काही वैशिष्ट्ये होती. छान, सावकाश, संथ माणूस होता. एक माणूस म्हणून तो पटकन आवडणारा, मोहक होता. त्यांचा सहवास लाभल्यावर प्रभावित झाला नाही असा माणूस सापडणं कठीण. आंदोलनाच्या काळात त्यांच्यावर कडक टीका करणारे समाजवादी पुढारी मला भेटले. परंतु हे पुढारी जेव्हा काही कारणानं जेपींच्या सोबत असत, तेव्हा विरघळून गेलेले असत. जेपींच्या कदमकुआँमधल्या घरात मी तीन-चार वेळा तरी त्यांना भेटलो भेटलो म्हणजे काय की ते काहीबाही करत होते आणि मी अवतीभोवती वावरत होतो. बैठका असत. माणसांशी ते बोलत असत. एखाद-दोन प्रसंगी मीही एखाद दुसरं वाक्य त्यांच्याशी बोललो असेन. सभोवतालचं वातावरण शांत व गंभीर असे. कोणी हसतबिसत नसे. जेपी बहुतेक वेळा ऐकत असत आणि अगदीच नाइलाज झाल्यावर बोलावं, तसं संथपणे थोडंसं बोलत. अगदी हलक्या आवाजात हजर असणाऱ्या प्रत्येक माणसाला माहीत असे, की जेपी या भारतातल्या सध्याच्या नंबर एकच्या माणसाच्या सहवासात आपण आहोत. सध्या भारत देशातल्या घडामोडी या एकाच माणसाच्या हालचालींवर अवलंबून आहेत. जेपी शांत असत. कधीही त्यांचा आवाज चढत नसे. अगदी क्वचित प्रसंगी ते रागावत पण तो रागही चेहरा त्रासिक होऊन व्यक्त होत नसे. चढा शब्द नसे. एखादं छोटंसं मूल मध्येच येई. त्याच्याशी जेपी आजोबांच्या प्रेमानं खेळत. बिहारमधला कोणी कार्यकर्ता आला, तर जेपी त्याच्या गावाची चौकशी करत, त्याच्या आई-वडलांची चौकशी करत. वातावरण चळवळीचं असलं तरी त्याला एक व्यक्तिगत डूब, स्पर्श असे. याचाही परिणाम होत असे. एकदा अशी भेट झाली की तो माणूस कायमचा भारलेला राहात असणार व आसपासच्या शेकडो माणसांना आपला अनुभव सांगून भारून टाकत असणार, कचेरीत त्यांचे चिटणीस, सल्लागार यांच्याशी त्यांची चर्चा होत असे. त्यांचे एक मदतनीस व सल्लागार माझे मित्र होते. त्यांच्याबरोबर मी चर्चा न्याहाळत असे. अटीतटीचे प्रसंग असत. पुढारी आणि पक्षांनी निर्माण केलेले पेच असत. इंदिरा गांधी व सरकार यांनी केलेले मोठ्ठे आरोप असत, जेपी शांतपणे ऐकत, वृत्तपत्रांना देण्यासाठी केल्या जाणाऱ्या निवेदनात सुधारणा सुचवत देशात गोंधळ चालला होता यचा मागमूसही जेपींच्या या बैठकीत लागत नसे, इतके ते थंड असत. पण थंड म्हणजे सिनिक नव्हे त्यांना चिंता असे चिंताही ते संयमानं व्यक्त करत. मी एकदा अनंतराव भालेराव व सदाशिवराव बागाइतकर यांच्याबरोबर जेपींकडे गेलो होतो. दोन-तीन तास मुलाखत व गप्पा चालल्या होत्या. आपण सत्तेच्या केंद्रस्थानी आहोत याची जाणीवही त्यांना नाही, असं त्यांच्या वागण्याबोलण्यात जाणवत असे. आपल्या गावाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या गोष्टी सांगितल्या गप्पा मारल्यागत वातावरण, तिथून उठून आम्ही एका सभेला गेलो. पाटण्यात, तिथंही जेपी दीडेक तास संथपणे बोलले. तिथंही गावातल्या आठवणी, स्वातंत्र्यचळवळीतल्या आठवणी. मी आणि विजय तेंडुलकर त्यांच्या मुलाखतीसाठी गेलो होतो. त्यांच्या घरी चळवळीच्या नेपथ्यावरच साऱ्या गोष्टी चालल्या होत्या. तरीही मध्ये मध्ये ते त्यांनी चालवलेल्या एका शाळेबद्दल बोलत होते. त्या शाळेतली गरीब मुलं, साधनांची कमतरता, मुलं शिकतील खरी, पण पुढं काय करतील, बिहारमधल्या गावांचं दैन्य कसं घालवायचं असे प्रश्न ते विचारीत आम्हांलाच आम्ही कसलं बोडक्याचं दैन्य घालवणार होतो! ते प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारलेले असत. मी जेपींच्याबरोबर काही प्रवास केला. मुंबईत, बिहारमध्ये, त्यांच्या कारमधून. त्यांच्या बाजूला बसून, त्यावेळी मी स्वस्थ बसत नसे. सतत प्रश्न विचारत असे. चळवळीबाबत. बहुतेक वेळ माझ्या बोलण्यात व त्यांच्या ऐकण्यात जाई. फार लांबलचक उत्तरं ते देत नसत. एकदा आमच्यापुढे सेक्युरिटीवाल्यांची गाडी फार धूळ उडवत चालली होती. जेपी वैतागले. त्यांना मुळात रागही येत नसावा किंवा आल्यास कमी तीव्रतेचा येत असावा, जो काही राग येईल तोही आणखी 'टोन डाऊन' करून व्यक्त करण्याची सवय, जेपींचा चेहरा थोडासा त्रासिक झाला. समोरच्या सीटवर बसलेल्या सुरक्षा रक्षकाला त्यांनी गाडी थांबवायला सांगितलं, तशी पुढली गाडीही धूळ उडवत, वेग कमी करत थांबली. पुढल्या गाडीतली माणसं विचारणा करायला आली. जेपींनी दोन गाड्यांत अंतर ठेवा, धुळीचा त्रास होतो असं सांगितलं. पुढच्या गाडीतले रक्षक जेपींच्या भक्तीतले अजीजीच्या शब्दांत म्हणाले, 'तुमच्या गाडीवर लक्ष निवडक अंतर्नाद ३४३