Jump to content

पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भरीव, ठोस काही व्हायचं नाही!' असा सावधगिरीचा इशारा मात्र दिला होता. तुमचे शब्द शरद जोशी खरे करून दाखवणार आहे हे मला तेव्हा माहीत नव्हतं. पण तसं असलं तरी मला प्रत्यक्ष कृतीच्या मार्गाने जायचं होतं. हजारो-लाखोंच्या लाटा दुरून पाहायच्या नव्हत्या, उठवायच्या होत्या. जमलं तर त्यांच्यावर स्वार व्हायचं होतं. तुम्ही फार वेगाने संघाकडे परत चालला होता हा माझ्यासाठी दुसरा जोरदार धक्का होता. मी संघ आणि नंतर ज्ञानप्रबोधिनी या दोन्ही ठिकाणी पुन्हा जाणार नव्हतो, जनता पक्षाच्या प्रयोगातल्या अपयशाचा दोष सर्वच नेते आणि घटक पक्षांचा होता हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं. मुळातच जनता पक्ष ही एक ऐतिहासिक गरज होती. आणीबाणी हटवणं एवढंच त्याचं प्रयोजन होतं हेही माझ्या लक्षात आलं होतं. मला पुढे जायचं होतं आणि तुम्ही मागे पाहत होता. तुमच्याच शब्दात सांगायचं तर "जावडेकरांचा यती, गांधी-विनोबांचा लोकसेवक संघाचा अपरिग्रही, अनिकेत स्वयंसेवक- प्रचारक भारतीय समाजवाद प्रस्थापनेची अखंड भारत संस्थापनेची ही वाट आहे, हा मार्ग आहे, कळेल त्याला कळेल, नाही त्यांनी खुशाल म्हणत लिहीत राहावं.... 'झोत' यकावेत.... संघ म्हणजे एक जुनाट व बुरसटलेली शक्ती आहे" वगैरे वगैरे, (ऑक्टोबर १९७९) मला हे काही पटत तर नव्हतंच पण त्यात एक अनुदारपणाही जाणवत होता. असतो.' त्यावर मी म्हटलं, 'अॅडजस्ट केलेलाच होता दौरा!' मग तुम्ही भडकलात. 'पाच वर्षांपूर्वी (संदर्भ 'जनांचा प्रवाहो' मधला संघाचा परामर्श ) तूच काय म्हणत होतास जरा आठवून पाहा!' मीही वैतागलो होतो, 'पाच वर्षात माझी वाढ झाली, मला काही नवीन इनपुट्स मिळाले. ते घेऊन मी माझी भूमिका ठरवली आहे; तुम्ही मात्र होता तिथेच आहात!' आणि चर्चा संपली. पुन्हा कोणत्याच विषयावर आपण फार मनापासून बोलल्याचं आठवत नाही. १९८३मध्ये रा. स्व. संघाचं पुण्यात तळजाईच्या पठारावर महाशिबिर मकर संक्रांतीचा दिवस गाठून भरवण्यात आलं होतं. संघाने आपलं इव्हेंट मॅनेजमेंटमधलं कौशल्य पणाला लावून ते यशस्वी केलं. तुम्ही या शिबिराचं स्वागत करणारा 'कर्टन रेझर' लेख 'माणूस' मध्ये लिहिताना म्हटलं होतं, "अन्यान्य क्षेत्रातील कार्य उभे राहिले तरी ते वाढवण्यासाठी, नवनवीन क्षेत्रांत पदार्पण करण्यासाठी, चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांचा पुरवठा सतत व्हावा लागणारच हे कार्यकर्ते घडविण्याचे, व्यक्तिगत व सार्वजनिक चारित्र्यनिर्मितीचे कार्य संघशाखा देशभर करीत आहेत. हे मूलभूत कार्य आहे.” तेव्हाही मला जरा 'हे अती होतं आहे असंच वाटलं होतं. मी त्या तीनचार दिवसांत पुण्यात थांबलो नव्हतो, एक्सप्रेसमध्ये मी फिरता प्रतिनिधी होतोच - बाहेर दौऱ्यावर गेलो होतो – मी एक 'मेसेज देत होतो. आज संघविचारांचा पंतप्रधान आहे. मात्र तुम्ही ज्या कामाची अपेक्षा संघाकडून करत होता, ते निदान शब्दरूपात तरी माहीत असलेले संघस्वयंसेवक किती आहेत कोण जाणे! नेमकं कुणाचं चुकलं होतं? 'माणूस' आज ना उद्या बंद करावा लागणार हे तर तुम्ही खूप आधीच - प्रत्यक्ष बंद करायच्या दहा वर्षं आधी ओळखलं होतं. किंबहुना आठवड्याभराने मी परत आलो तेव्हा पुणे शहर संघाच्या व्यवस्थापन कौशल्याने थक्क झालेलं होतं; अगदी टीकाकारदेखील नियोजनाला दाद देत होते. यथावकाश आपण भेटलो. तुम्ही जरा नाराजीनेच विचारलंत, 'अरे इतकं सुंदर शिबिर झालं. तू कुठे होतास?' मी दौऱ्यावर असल्याचं सांगितल्यावर तुम्ही जास्तच रागावलात. अशा वेळी दौरा अॅडजस्ट करायचा असं व्हायला नको होतं, माजगावकर, आपण दोघांनीही एक पाऊल मागे जाऊन संवाद टिकवायला हवा होता, इतकं आपल्या दोघांच्या वाटचालीत साम्य होतं! आपण दोघेही कॉलेजसाठी पुण्याला आलो. दोघांनीही संघामध्ये शाळेची वर्षं घालवलेली, दोघेही गुजराथीबहुल प्रदेशातून आलो - बडोदा आणि मुलुंड, संघात असलो तरी दोघांनाही टिळक, सावरकर यांचं प्रचंड आकर्षण, दोघांनाही संघाच्या कंटाळवाण्या अनाकर्षक विचारहीनतेचं वावडं, दोघेही चांगले वक्त, दोघांनाही शास्त्रीय संगीताची आवड, काही शिक्षणही घेतलेलं; मुख्य म्हणजे भारतीय राष्ट्रवादाचा नवा अजेंडा ठरवण्यात दोघांनाही स्वारस्य ! आपण उगीच वेगळे झालो. 'माणूस' ही एका विशिष्ट परिस्थितीमधली एक मोठी यशस्वी, अभिमानास्पद झेप होती. परिस्थिती बदलली तशी 'माणूस' सारख्या व्यासपीठाची/माध्यमाची गरज कमी होणारच होती. १० / १२ वर्षांचंच त्या फारकतीनंतर तुमचं आयुष्य होतं. त्यातच शेवटची दोन-तीन वर्षं आजारपणातच गेली होती. मी मात्र गेल्या ३० वर्षांचा ताळेबंद मांडायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या क्षणापाशी येऊन थांबतो; नेमकं कुणाचं चुकलं होतं? 'माणूस' आज ना उद्या बंद करावा लागणार हे तर तुम्ही खूप आधीच प्रत्यक्ष बंद करायच्या दह्य वर्षं आधी ओळखलं होतं. किंबहुना 'माणूस' ही एका विशिष्ट परिस्थितीमधली एक मोठी यशस्वी, अभिमानास्पद झेप होती. परिस्थिती बदलली तशी 'माणूस' सारख्या व्यासपीठाची/माध्यमाची गरज कमी होणारच होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दहा वर्षं झाल्यावर नवा देश घडवण्याचं काम केवळ सरकार करूच शकणार नाही, सरकारकडे तेवढा वैचारिक आवाका नाही आणि बांधिलकीही नाही हे तुम्ही ओळखलंत आणि 'माणूस' चा जन्म १९६०च्या दशकात सगळ्याच राजकीय आर्थिक विचारप्रणालींचे समर्थक आपापल्या भूमिकांचा पुनर्विचार करण्याच्या मन:स्थितीत होते; कारण भारतामधल्या गुंतागुंतीच्या झाला. निवडक अंतर्नाद •२१७