पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेवढाच तुला आणि हणम्याला आधार, " थंडथंड धनाजीच्या शेजारी शेवंताक्का नुसतीच बसून राहिली. बायका चुकचुकू लागल्या. हणमा रडू भेकू लागला. शेवंताक्काचा पदर फाटला. शेवंताक्काचं आभाळ फाटलं. शेवंताक्काच्या कपाळावरचा कुंकवाचा ठसा सुटला. सगळं उजाड झालं. ओसाड झालं. सळसळणाऱ्या नागराजाकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, जो तो आपल्याच तंद्रीत. जो तो आपल्याच गर्दीत. आज आपला सण, आज ऐटीत फिरू, पुन्हा उद्याचं उद्या बघून घेऊ. जनावर धावतच होतं. "प्लॅटफॉर्म क्रमांक चारपर आनेवाली गाडी, दो बचकर चालीस मिनटकी हार्बर लाइनसे छत्रपती शिवाजी टर्मिनस जानेवाली धीमी लोकल है." निवेदिकेचा गिचमिड आवाज घुमला. गाडी अजून फलाटात यायची होती. गाडी येणार तोवर कुणाच्यातरी पायात जनावर अडखळलं. "सापऽऽ सापऽऽ अस्सल नाग दिसतोयऽऽ" आरडाओरडा झाला. धक्काबुक्की, चेंगराचेंगरी, जीव वाचविण्याची धडपड, पडापड याला ऊत आला. गाडी मस्तीत आत शिरली. गडबड- गोंधळात, ढकला ढकलीत चारजण रूळावर पडले. रेल्वेच्या चाकांचा घास झाले. किंकाळ्या आणि रक्ताच्या चिळकांड्या एकाचवेळी उडाल्या. किंकाळ्या दबल्या तरी फलाटावर उडालेलं रक्त शांतपणे खाली ओघळत राहिलं. काठी आपटणाच्या हवालदाराला साप दिसला तसे त्याचे डोळे विस्फारले. त्याचं पोलिसी डोकं चाललं तो धावतच फ्लायओव्हर ब्रिज चढला, शेवंताक्काच्या जवळ गेला, तिची एक टोपली रिकामी होती. शेवंताक्काला लाथेनं उठवीत तो दंडाला धरून फरफटत पोलीस स्टेशनच्या दिशेनं खेचू लागला. शेवंताक्काच्या नागाचं आयेशाबीला कळलं, तसं ती डोकं धरून खाली बसली. "या अल्ला! क्या दिन दिखाया तूने? और कितनी झडती लेनेवाला है तू? मैं ही पागल, वो जाती नहीं थी, तो मैनेही उसको दबाकर भेजा. " आयेशाबी स्वतःच्याच झिंज्या उपटून घेऊ लागली. तसं तिला नगरसेवक बनसोडेनं सावरलं. "ये सामने क्या पड़ा है, उसको पयले देखना पड़ेगा भाभी. " १२८ निवडक अंतर्नाद आयेशाबी वरमली. एका पोराला तिनं इसाकभाईकडे पिटाळलं. "शेवंताक्काको जल्दी छुडाके लाव बोलना इसाकभाईको म्हणत ती परत येणाऱ्या संकटामध्ये घुसली. इसाकभाई तिला सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि तोवर आपण हे सगळं निस्तरू या. कुठल्याही क्षणी झोपड्या तोडणारी लोकं येणार होती. कुर्ल्याला आणि शिवडीला अगोदरच तोडा-तोडी झाली होती. बनसोडे सावध झाला होता. फोर्स मोठा आहे. म्युनिसिपालटी, रेल्वेवाले आणि पोलीस एकाच वेळी तिथे चाल करून येणार होते. आपण काहीही करून गोवंडी ते मानखुर्द एवढ्या झोपड्यांचा पट्टा वाचवायचाच. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही वाजली तर मोडून खाऊ, तोडातोडी थांबवली तर एका रात्रीत हिरो, पुढच्या वेळी विधानसभा, तोडातोड झालीच तरी लोकांना कळणार शेवटपर्यंत आपल्यासाठी भांडला. म्युनिसिपालटीच्या पुढच्या निवडणुकीतही वार्ड सुरक्षित. - बायकांनी कसं आडवं पडायचं, पोरांनी कशी दगडफेक करायची हे सगळं बनसोडे सांगत गेला. ऐकणारे ऐकत गेले. Scaugh "माणसं मेलीत चार, जखमी झालेत सतरा. मेलेल्यांचे नुकसान दावे वेगळे जखमी झालेल्यांची मलमपट्टी वेगळी. कसं करतोस इसाकभाई? झेपणार नाही तुला. ह्या म्ह्यतारीला मरू देत इथंच. तू जा निघून.” इन्स्पेक्टर सांगत गेला, तसा इसाकशेठ गांगरला. “अरे साब, ऐसा मत करो, बेचारी गरीब, बुढी औरत हाथियार हाथ में लेके थोडाही किसीको मारा " तो तुझेही लॉकअपमें डालता हूँ! "खुशीसे मेहरबान, कुछ चिंता नहीं, अपनेका क्या, चार दिन अंदर, चार दिन बाहर चलते ही है. मगर उस बुढीका कुछ करो साब, " “कसं काय करणार? किती जालीम केस आहे ही!” "साहेब यावेळी तीनशे तरी आणले. गेल्यावेळी पाचशे साप आणले होते मी बाहेरच्या जंगलातनं, कभी कुछ नहीं हो गया. आजही ऐसा क्यूं हो गया अल्ला जाने.” "खरं सांग किती कमावतोस?" "वो तो धंदे की बात है साब, साप लानेका, आज दिनभर बिठानेका, उद्या स्थानिक गारुड्यांना हजार-पाचशे को बेच डालनेका, हरसालका खेल है साब और हमारा तुम्हारा तो रोजका